जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग प्लॅटफॉर्म Whatsapp च्या सेवा मंगळवारी दुपारी अचानक ठप्प झाल्या आणि दोन तासांनंतर पुन्हा पूर्ववत झाल्या. व्हॉट्सऍपची सेवा बंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असे अनेकदा घडले आहे. प्रत्येक वेळी फक्त व्हॉट्सऍप रिस्टोअर होईपर्यंत केवळ प्रतीक्षा करण्याचा पर्याय वापरकर्त्यांकडे असतो.
हे सुद्धा वाचा : Apple चा मोठा निर्णय ! USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन iPhone, वाचा डिटेल्स
Whatsapp डाऊन झाल्यानंतर लाखो युजर्स एकमेकांना मेसेज पाठवू शकले नाहीत आणि त्यांना ऍपच्या इतर सेवांमध्ये देखील प्रवेश मिळत नव्हता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सऍप डाउन सारख्या प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांना ही समस्या का आली आणि किती वेळात ती दूर होईल हे माहित नसते.
Whatsapp हे इतर ऍप्सप्रमाणेच कोड-आधारित प्लॅटफॉर्म आहे, परंतु त्याचा यूजरबेस इतर ऍप्सपेक्षा खूप जास्त आहे. या ऍपचे जगभरात दोन अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत, ज्यांची माहिती आणि डेटा त्याच्या सर्व्हरवर संग्रहित आहे. या सर्व्हरमध्ये सुधारणा किंवा कोणत्याही बदलाची आवश्यकता असल्यास, डेटा पर्यायी सर्व्हरवर पाठविला जातो. प्रत्येक वेळी अर्थातच कंपनी कारण म्हणून 'तांत्रिक दोष' असे उत्तर देत असते.
सायबर अटॅक किंवा हॅकिंगसारख्या धोक्यामुळे WhatsApp सर्व्हर प्रभावित होऊ शकतात. याशिवाय अनेक नेटवर्किंग प्रोटोकॉलही त्यावर लागू होतात आणि नेटवर्किंगशी संबंधित समस्यांमुळेही सेवा डाउन होण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा की व्हॉट्सऍप देखभाल किंवा बदलांसाठी ब्रेक घेत नाही, त्यामुळे सतत सेवा देणे हे ऍपसाठी सोपे काम नाही. कंपनी डेटा सेंटर्स आणि वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसमधील कम्युनिकेशन अनेक स्तरांवर होते, म्हणूनच कधीकधी Whatsapp डाउन होण्याचे कारण शोधण्यासाठी बराच वेळ लागतो.