रिचार्जशिवाय ‘या’ App द्वारे हवं तितकं फ्री कॉलिंग करा, इंटरनेटची सुद्धा गरज नाही
रिचार्ज आणि इंटरनेटशिवाय फ्री कॉलिंगची सोय झाली.
Bluetooth Walkie Talkie नावाच्या ऍपद्वारे फ्री कॉलिंग करता येईल.
Bluetooth Walkie Talkie चा वापर कसा करावा ?
फ्री कॉलिंगची सुविधा येऊन आता बरेच वर्ष झाले आहेत. सर्व दूरसंचार कंपन्या विनामूल्य कॉल करण्याचा दावा करतात, कारण त्यांनी यासाठी आधीच तुमच्याकडून पैसे घेतले आहेत. पण तुम्ही रिचार्जशिवाय किंवा कोणतेही शुल्क न देता एका App च्या माध्यमातून आयुष्यभर मोफत कॉलिंग करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला इंटरनेटची सुद्धा आवश्यकता नाही.
Bluetooth Walkie Talkie
तुम्हालाही पैसे आणि इंटरनेट खर्च न करता आयुष्यभर मोफत कॉल करायचे असतील, तर तुम्ही हे कशाप्रकारे करू शकता. तर यासाठी 'Bluetooth Walkie Talkie' नावाचे ऍप आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवर जा आणि तिथे तुम्हाला 'Bluetooth Walkie Talkie' नावाचे ऍप मिळेल. प्ले स्टोअरवरून ब्लूटूथ वॉकी टॉकी डाउनलोड करा आणि तुमच्या फोनवर इन्स्टॉल करा.
Bluetooth Walkie Talkie चा वापर कसा करावा ?
ऍप ओपन करा. आता तुम्हाला स्क्रीनवर Wi -Fi आणि रिफ्रेश बटण दिसेल. आता हे ऍप तुम्हाला ज्या मित्राशी बोलायचे आहे, त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायला सांगा. आता तुमच्या फोनवर ऍप ओपन करा आणि Wi -Fi आणि रिफ्रेश बटणवर क्लिक करा.
बटणवर क्लिक केल्यावर, तुम्हाला जवळपासच्या सर्व ब्लूटूथ उपकरणांची सूची मिळेल. आता तुम्हाला ज्या मित्राशी बोलायचे आहे त्याच्या ब्लूटूथ डिव्हाइसवर टॅप करा. मित्राचा फोन टॅप करताच रिंग होईल.
रिंग वाजल्यानंतर ब्लूटूथ उपकरणाचा रंग लाल होईल आणि कॉल आल्यावर हिरवा होईल. तुमच्या सोयीसाठी ऍपमध्ये स्पीकरही देण्यात आला आहे. मात्र, तुम्ही 100 मीटरच्या आत असलेल्या व्यक्तीसोबतच याद्वारे संपर्क करू शकता, कारण ब्लूटूथची श्रेणी 100 मीटर आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile