भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) अॅप ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन कॅशबॅक प्लान जाहीर केला आहे, ही ऑफर सामान्य यूजर्स आणि व्यापारी दोघांसाठी तसेच नवीन आणि जुने सर्व युजर्स याचा लाभ घेऊ शकतात. कस्टमर कॅशबॅक स्कीम मध्ये यूजर्सना दर महिना 750 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल, तर व्यापारी प्रतिमाह 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकतात. डिजिटल इंडिया च्या ट्वीट वरून ही बातमी देण्यात आली आहे.
नवीन BHIM अॅप यूजर्सना आपले पहिले ट्रांजेक्शन पूर्ण केल्यावर 51 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. या अॅपला यूजर्सना आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर शी जोडावे लागेल. यूजर्सना आपल्या बँक अकाउंट शी याला लिंक करावे लागेल आणि कॅशबॅक अमाउंट मिळवण्यासाठी पहिले ट्रांजेक्शन करावे लागेल. VPA/UPI ID, अकाउंट नंबर किंवा मोबाइल नंबर द्वारे प्रत्यक्ष युनीक ट्रांजेक्शन वर BHIM अॅप 25 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण ऑफर करत आहे. ट्रांजेक्शन ची कमीत कमी रक्कम 100 रूपये असणे आवश्यक आहे. यूजर्स प्रति माह जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकतात.
जर BHIM अॅप यूजर्सनी प्रतिमाह 25 किंवा त्यापेक्षा जास्त पण 50 पेक्षा ट्रांजेक्शन केल्यास त्यांना 100 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल. जे यूजर्स प्रतिमाह 100 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करतील त्यांना करते 250 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हे सर्व ट्रांजेक्शन 10 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना प्रत्येक ट्रांजेक्शन वर 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल आणि याची अधिकतम वॅल्यू 50 रूपये असेल.
BHIM अॅप UPI (यूनिवर्सल पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित अॅप आहे जो सरळ बँक अकाउंट शी लिंक होतो. तुमचे मित्र नातेवाईक किंवा ज्या व्यापाऱ्याला तुम्ही पेमेंट करू इच्छित असाल तो BHIM अॅप वर असणे आवश्यक नाही. पेमेंट रिसीव करण्यासाठी यूजर्स कडे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. BHIM च्या माध्यमातून IFSC किंवा MMID द्वारा पण पैसे ट्रांसफर केले जाऊ शकतात.