International Yoga Day : फिटनेसची काळजी घेणे झाले आणखी सोपे, iPhone साठी सर्वोत्कृष्ट पाच योग ऍप्स
फिटनेसची काळजी घेणे आता अधिकच सोपे होणार
iPhone साठी सर्वोत्कृष्ट पाच योग ऍप्स
योग, मेडिटेशन आणि आरोग्यासंबंधित बरीच माहिती उपलब्ध असलेल्या ऍप्सची यादी बघा
2015 पासून दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगाने आपले आरोग्य कसे निरोगी ठेवता येते, योगामुळे कोणताही आजार कसा बरा होतो आणि रोजच्या योगामुळे निरोगी शरीर कसे निर्माण होऊ शकते हे जगाला सांगणे हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश आहे. आता तुम्हाला योगासाठी कोणत्याही योग क्लासेसवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमच्या घरी योगगुरूंसोबत योगा करू शकता. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iPhone साठी सर्वोत्तम योग ऍप्सबद्दल सांगणार आहोत…
PRAYOG
प्रयोगा या ऍपच्या नावातच योग आहे. तुम्हाला योगा सुरू करायचा असेल तर हे ऍप तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही ते Apple च्या App Store वरून विनामूल्य डाउनलोड करू शकता आणि तुमच्या Apple Watch शी कनेक्ट देखील करू शकता. यामध्ये योग आणि सर्व प्रकारची आसने सविस्तरपणे सांगितली आहेत.
Wysa
Wysa एक चॅटबॉट ऍप आहे, ज्यामध्ये लोक CBT, DBT, योग आणि मेडिटेशन द्वारे चॅट करतात. हे ऍप तुमचे नैराश्य, तणाव, झोप इत्यादींसाठी मदतगार ठरेल. एवढेच नाही तर, मानसिकदृष्ट्या हे ऍप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
हे सुद्धा वाचा : Tecno ने लाँच केला आणखी एक उत्कृष्ट स्मार्टफोन, 5000mAh बॅटरीसह मिळतील जबरदस्त फीचर्स
cult.fit
तुम्हाला cult.fit ऍपबद्दल माहिती असेलच. हे फिटनेससाठी एक पॉवरहाऊस ऍप आहे. या ऍपमध्ये फन करत करत योगा करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. या ऍपद्वारे तुम्ही योगासने करताना मेडिटेशन करू शकता. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्याकडे cult.fit ऍप असल्यास, तुमच्या फोनमध्ये एक जिम असण्यासारखेच आहे.
Asana Rebel
वजन कमी करण्यापासून ते शरीर मजबूत करण्यापर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला या ऍपमध्ये मिळेल. हे ऍप दररोज व्यायाम आणि योगासने करण्यास प्रवृत्त करते.
हे सुद्धा वाचा : तुमच्यासाठी सर्वोत्तम कॅमेरा आणि बॅटरी असलेले 4 स्मार्टफोन्स, Amazon सेलमध्ये उपलब्ध
Urban: Sleep & Meditation
या ऍपवर तुम्हाला रोजचे मेडिटेशन आणि योगा करण्याचे सर्व मार्ग समजतील. तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तरीही हे ऍप तुम्हाला मदत करेल. यासोबतच Apple हेल्थ ऍपचाही सपोर्ट आहे. यात योग, रिलॅक्स आणि मेडिटेशन इ. सर्वकाही मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile