WhatsApp लवकरच युजर्ससाठी एक खास फीचर घेऊन येत आहे. ज्यामुळे तुम्हाला मेसेज पाठवल्यानंतरही ते एडिट करता येणार आहेत. मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप बीटा व्हर्जनवर एडिट बटणची टेस्टिंग करत आहे. सध्या, व्हॉट्सऍपकडे एक डेडिकेटेड एडिट ऑप्शन नाही आहे. सध्या वापरकर्ते मॅसेज फक्त डिलीट करू शकतात, एकदा पाठवलेला मॅसेज एडिट करू शकत नाहीत. परंतु नवीन फीचरमध्ये मॅसेज पाठवल्यानंतर ते एडिट करण्याचे ऑप्शनदेखील मिळेल.
व्हॉट्सऍपशी संबंधित सर्व घटनांचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने हे फीचर पाहिले. व्हॉट्सऍपने लोकांच्या मेसेज करण्याच्या पद्धतीत काही मोठे बदल केले आहेत. रिऍक्ट मेसेज फीचर रिलीज झाल्यानंतर व्हॉट्सऍप आता यूजर्सला मेसेज पाठवल्यानंतर एडिट करण्याची परवानगी देणार आहे. व्हॉट्सएने पाच वर्षांपूर्वी या फीचरवर काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु ट्विटरवर त्याची तक्रार झाल्यानंतर लगेचच ते वगळण्यात आले. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीनंतर व्हॉट्सऍपने पुन्हा एडिट फीचरवर काम करण्याचा विचार केला आहे.
हे सुद्धा वाचा: 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह Vivoचा नवीन स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ 15,000 रुपये
Wabetainfo ने सध्या विकसित केलेल्या एडिट फिचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात तुम्ही पाठवलेला मेसेज सिलेक्ट केल्यावर तुम्हाला एडिट करण्याचा पर्याय दिसत असल्याचे, समोर आले आहे. मेसेज कॉपी आणि फॉरवर्ड करण्याच्या ऑप्शनसोबत युजर्सला एडिट ऑप्शन देखील मिळेल. एडिट बटण निवडून, तुम्ही मॅसेज पाठवल्यानंतरही तुम्हाला तुमचा मॅसेज एडिट करण्याचा पर्याय मिळणार आहे.
WhatsAppने युजर्ससाठी ऑनलाईन पेमेंटची देखील सुविधा आणली आहे. त्याबरोबरच याद्वारे तुम्हाला पैसेदेखील कमवता येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहेत. या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट केल्यानंतर 35 रुपायांचा कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, यासाठी कंपनीने काही अटी देखील लागू केल्या आहेत. WhatsApp पेमेंटचा पर्याय वापरून पहिल्याच व्यवहारानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा लाभ युजर्सना तीन वेळा वेगवेगळ्या पेमेंट ट्रान्सफरवर घेता येणार आहे.