जर तुम्ही एखादी म्युझिक सर्व्हिस बदलली असेल तर तुम्हाला तुमची आवडती गाणी शोधायला थोडी अडचण होते. Apple music, Spotify किंवा Gaana इतर कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही तुमची आवडती प्लेलिस्ट ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला निफ्टी टूल Soundiizचा वापर करावा लागेल. या टूलने तुमची आवडती प्लेलिस्ट तुम्ही सहज ट्रान्सफर करू शकता. चला तर बघुयात या टूलचा वापर कसा करता येईल.
– तुमच्या डिवाइसवर Soundiiz.comवर जा आणि वरील उजव्या कोपऱ्यात दिलेल्या बटनने लॉग इन करा.
– आता तुम्ही थेट Soundiiz वेब ऍपवर जाल.
– येथे डाव्या बाजूला मेनू आयकॉनवर क्लिक करून कनेक्ट सर्व्हिसेसच्या ऑप्शनवर क्लिक करा.
– त्या सर्व्हिसेस कनेक्ट करण्यासाठी बटन प्रेस करा, ज्याने तुम्हाला प्लेलिस्ट ट्रान्सफर आणि सिंक करायचे आहे.
– टूल्स सेक्शनमधील 'ट्रान्सफर'वर टॅप करा.
– तुम्हाला तुमची प्लेलिस्ट कुठे ट्रान्सफर करायची आहे ते सिलेक्ट करा आणि तुम्हाला कोणती प्लेलिस्ट ट्रान्सफर करायची आहे, ती सिलेक्ट करा.
– यानंतर 'स्टार्ट' वर क्लिक करा.
– ती प्लेलिस्ट सिलेक्ट करण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा, जी तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे.
– जर तुम्ही फ्री साउंडीझ युजर आहात तर, तुम्ही एका वेळी एकच प्लेलिस्ट ट्रान्सफर करू शकता.
– पुढे जाण्यासाठी कन्फर्म बटन्स तोवर क्लिक करत रहा, जोवर तुम्हाला ट्रान्सफरिंग स्क्रीन दिसत नाही.
अशाप्रकारे तुमची आवडती म्युझिक प्लेलिस्ट अगदी सहजपणे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करता येईल.