अॅनड्रॉईड यूजर्ससाठी अॅप्पलने आपली नवीन म्युझिक सेवा सादर केली आहे. अॅप्पलने गुगलच्या अॅनड्रॉईड प्लेटफॉर्मवर आपल्या म्युझिक स्ट्रीमिंग सर्विस अॅप्पल म्युझिक लाँच केली आहे. अॅनड्रॉईडसाठी लाँच झालेल्या अॅप्पल म्युझिकच्या अनेक फीचर्स iOS शी मिळते-जुळते आहे. केवळ ह्यात म्युझिक व्हिडियोज असलेला फीचर नाहीय.
आता अॅनड्रॉईड युजर्ससुद्धा गुगल प्ले स्टोरवरुन अॅप्पल म्युझिकला डाऊनलोड करु शकतात. ह्या अॅपमध्ये अॅप्पलने आपल्या iOS डिझाईनला तसेच ठेवले आहे. जरी ह्याने आपल्या हॅमबर्गर मेन्यूला हटवले असले तरीही. ह्या मेन्यूच्या माध्यमातून आपण दुस-या विभागात जसे रेडियो, प्ले लिस्ट सारख्या टॅब्समध्ये जाऊ शकता. त्याशिवाय हा अॅप एकदम iOS व्हर्जनसारखा दिसतो. iOS सारखे अॅनड्रॉईडमध्येही म्युझिकल रिकमेंडेशन, प्ले लिस्टसारखे पर्याय आहेत. जर आपण iTunesच्या माय म्युझिक पेजवरुन कोणते म्युझिक डाऊनलोड केले असेल तर, त्यालासुद्धा आपण अॅनड्रॉईड व्हर्जनमध्ये चालवू शकता. त्याचबरोबर गाणे डाऊनलोड करुन ते ऑफलाईन ऐकू शकता. अॅप्पलचा खाजगी रेडियोसुद्धा ह्यात आहे. तथापि अॅपच्या अॅनड्रॉईड व्हर्जनमध्ये म्युझिक व्हिडियोजचा पर्याय नाही. अॅप्पलनुसार ह्याला लवकरच आणले जाईल.
हा अॅप्पलचा पहिला अॅप आहे, ज्याला सर्वसामान्य अॅनड्रॉईड यूजर्ससाठी लाँच केला गेला आहे. तथापि, ह्याआधी अॅप्पलचे काही अॅप आले होते, मात्र ते टेस्टिंगसाठी होते आणि फक्त ठराविक युजर्सलाच ते दिले गेले होते. तसेच त्याचे विशेष महत्त्व सुद्धा नव्हते. अॅप्पल म्युझिक आता बीटा व्हर्जनमध्येच आहे. बीटा व्हर्जनचा ट्रायल व्हर्जन असतो. अॅप्पलने ट्विट करुन ही माहिती दिलीय.