ऍपल यूजर्सना सध्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. Apple च्या FaceTime ऍप मध्ये एक बग मुळे यूजर्स हैराण आहेत आणि हा बग असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. या बग मुळे येणारी अडचण अशी की जर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही कोणाला कॉल केला तर कॉल रिसीव केल्या विना पण दुसऱ्या यूजरचा कॉल ऐकायला येतो. असे पण बोलले जात आहे कि या बग मुळे FaceTime कॉल रिसीवरच्या फोन कॉलला एका माइक्रोफोन मध्ये चेंज करतो.
बग मुळे यूजर्सची प्राइवेसी आणि सिक्युरिटी पण धोक्यात आली आहे. बग आल्यामुळे यूजर्सची खाजगी माहिती पण सार्वजनिक होत आहे, तेही त्याच्या मर्जी विना. त्यामुळे बग च्या या समस्येमुळे FaceTime च्या यूजर्सचा विश्वास पण ऍपलच्या या ऍप वरून कमी होत आहे. एक खास बाब म्हणजे इनकमिंग कॉल रिसीव करायचा नसल्यास जेव्हा यूजर पवार बटण दाबतो, तेव्हा फोन वर कॉल करणाऱ्याचा वीडियो समोर येतो.
जरी Apple ने हा बग असल्याचे मान्य केले असले तर अजून या बगबद्दल कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच रिपोर्ट्स नुसार Apple ने सांगितले होते कि ते हि समस्या दूर करण्यासाठी लवकरच यूजर्स साठी एक अपडेट आणतील जेणेकरून त्यांची हि समस्या दूर होईल.