Google ने अधिकृतपणे आपल्या एंड्राइड Q चे नाव Android 10 केले आहे. एंड्राइड 10 बीटा याच महिन्यात सादर करण्यात आला होता, पण अधिकृतपणे सादर होण्यास अजून जास्त काळ उरला नाही. एंड्राइड 10 मध्ये तुमच्या प्राइवेसी वर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच याच्या UI मध्ये पण तुम्हाला अनेक बदल दिसतील. चला आता एक नजर टाकूया एंड्राइड 10 च्या टॉप 10 फीचर्स वर, जे तुम्हाला एकदा तरी वापरायला नक्की आवडतील.
हा एक सर्वात चांगला आणि लोकप्रिय फीचर आहे, जो तुम्हाला एंड्राइड 10 मध्ये दिसेल. तसेच गूगलच्या जवळपास सर्व ऍप्लीकेशन्स मध्ये डार्क मोड इम्प्लिमेंट केला गेला आहे. आता हा सिस्टम-वाइड स्थरावर एंड्राइड 10 मध्ये दिला जाणार आहे.
तुम्हाला एंड्राइड 10 मध्ये एक लाइन मिळणार आहे, जी तुम्ही स्वाइप करून होम पेज वर जाऊ शकता. तसेच तुम्ही या स्वाइपने काहीही करू शकता. तुम्ही हि एक मल्टीटास्किंग मेनू म्हणून वापरू शकता. यावरून असे समजते आहे कि गूगल बॅक बटण पण काढून टाकणार आहे, आता असे वाटत आहे कि गूगल, iPhone सारखा मेनू वापरणार आहे.
यूजरबेस बद्दल बोलायचे तर गूगल आता याच्या लेंग्थ आणि ब्रेड्थ बाबत गांभीर्याने विचार करत आहे. लाइव कॅप्शन च्या माध्यमातून तुमच्या फोन वर जे काही करत असाल त्याचे रियल-टाइम कॅप्शन तुम्हाला दिसणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुमच्या फोनला इंटरनेटची पण गरज नाही, हि सर्वात चांगली बाब म्हणता येईल. हे ऑफलाइन पण चालू शकतात.
एंड्राइडचा शेयरिंग मेनू त्याच्या UI चा एक महत्वपूर्ण भाग आहे. हा लोड करण्यास स्लो असतो, आणि जसा हा आहे त्यामुळे याचा खरा फील नाही येत. गूगल ने हि समस्या एंड्राइड 10 मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. एंड्राइड 10 मध्ये शेयर UI लगेच लोड होऊ शकेल. तसेच शेयरिंग शोर्टकट पण लॉन्च केला जाणार आहे.
जग काही काळापूर्वी आपल्या प्राइवेसी बद्दल इतके गंभीर नव्हते, जितके आता झाले आहे. गूगलला आता हे समजले आहे कि हा एक महत्वपूर्ण भाग आहे, आणि याचे ऍप्स आणि सेवांपासून सुरक्षेसाठी असणे किती महत्वाचे आहे. आजकाल तुमची माहिती कोणीही ऍक्सेस करू शकतो. पण जर तुम्ही Privacy बद्दल चिंतीत असाल तर तुम्हाला एंड्राइड 10 मध्ये खूप काही मिळणार आहे.
गूगल आता रंगांसोबत खेळू पाहते आहे आणि तुम्हालाही त्या रंगात रंगवायचे आहे. बाय डिफॉल्ट, गूगलचा एंड्राइड UI तुम्ही ब्लू रंगात दिसत होता. एंड्राइड 10 मध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन मिळणार आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची थीम बदलू शकता. हे आता तुम्ही आपल्या आवडीच्या रंगांत म्हणजे ब्लू, ब्लॅक, ग्रीन, वर्पल, सिनेमन, ओसियन, स्पेस आणि आर्किड रंगांत बदलू शकता. कदाचित फाइनल वर्जन मध्ये तुम्हाला हे सर्व दिसणार नाहीत.
तसे याला खूप साधारण ऍडिशन म्हणता येईल, पण एंड्राइड मध्ये हा फीचर आतापर्यंत नव्हता. एंड्राइड 10 मध्ये तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगचे फीचर आपोआप तुम्हाला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला डेवेलपर्सच्या सेटिंग मध्ये जाऊन हा इनेबल करावे लागू शकते.
तुम्हाला एंड्राइड 10 मध्ये एक अगदी नवीन नेटिव डेस्कटॉप मोड मिळणार आहे, हा काहीसा सॅैमसंग मधील फिचर सारखा आहे. जेव्हा तुम्ही आपला फोन एका एक्सटर्नल मॉनिटरशी कनेक्ट करता तेव्हा तुमच्या फोन मध्ये एक डेस्कटॉप मोड स्विच होतो. हा एक भन्नाट फीचर आहे.
जर तुम्हाला तुमच्या वाई-फाई चा पासवर्ड लक्षात नसेल तर आता तुम्हाला तो आठवण्यासाठी डोके खाजवण्याची गरज नाही. एंड्राइड 10 मध्ये तुम्हाला यासाठी पर्याय मिळणार आहे. एंड्राइड 10 मध्ये तुम्ही वाई-फाई QR कोड स्कॅन करून शेयर करता येईल. पण एक QR कोड मिळवण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक सिक्यूरिटीचा सामना करावा लागेल.
जेव्हा सॅमसंग गॅलेक्सी Fold आणि Huawei Mate X मोबाईल फोन्स लॉन्च केले गेले होते तेव्हा कशाप्रकारे एंड्राइड 10 फोल्डेबल या फोन्ससाठी उपयोगी पडेल याची चर्चा होती. पण आता समोर येत आहे कि एंड्राइड 10 मध्ये तुम्हाला फोल्डेबल फोन्सचा सपोर्ट मिळणार आहे.