अॅमेझॉन इंडियावर सुरु झालाय मेगा मोबाईल सेल
ह्या सेलच्या अंतर्गत ऑनर 4X ९,४९९ रुपयांत, सोनी एक्सपिरिया Z3+ २३,९९९ रुपयात, लेनोवो वाइब S1 १४,९९९ रुपयात मिळत आहे. त्याचबरोबर इतर फोन्सवरही उत्कृष्ट ऑफर्स मिळत आहे.
जर तुम्ही मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल, तर आपल्याला आजपासून सलग चार दिवस ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर उत्कृष्ट ऑफर्स मिळतील. त्याचे कारण म्हणजे अॅमेझॉनवर आज पासून मेगा मोबाईल सेल सुरु झाला आहे. हा सेल ३१ मार्चपर्यंत चालेल. ह्या सेलद्वारे अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सवर उत्कृष्ट डिस्काउंट देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यूजर शॉपिंगच्या दरम्यान सिटी बँकचे क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करुन १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे.
ह्या सेलमध्ये हुआवे नेक्सस 6P च्या 64GB च्या वेरिएंटवर ३५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन आता केवळ ३९,४९९ रुपयात मिळेल. त्याचबरोबर नेक्सस 6P च्या 32GB वेरिएंटवर १,९९० रुपयांची सूट मिळत असून, हा फोन तुम्हाला ३४,९९९ रुपयात मिळेल.
त्याशिवाय मोटोरोला मोटो G (जेन 3) चा 16GB मॉडल ९,९९९ रुपयात मिळत आहे. कूलपॅड नोट 3 चा 16GB चा मॉडल ८,४९९ रुपयात मिळत आहे. ह्या सेलच्या अंतर्गत ऑनर 4X ९,४९९ रुपयात, सोनी एक्सपिरिया Z3+ २३,९९९ रुपयात, लेनोवो वाइब S1 १४,९९९ रुपयात मिळत आहे. त्याशिवाय ह्या सेलमध्ये इतर फोन्सवरही उत्कृष्ट डिस्काउंट मिळत आहे.
अॅमेझॉनच्या ह्या सेलमध्ये लेनोवो वाइब K4 नोट आणि एंटवीआर व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटसह १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. ह्यांना १३,२९९ रुपयात लाँच केले होते.
हेदेखील वाचा – ६ एप्रिलला लाँच होऊ शकतो मिजू M3 नोट स्मार्टफोन
हेदेखील वाचा – १००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स