एअरटेलने आपल्या Wynk सह मिळून Wynk Music आणि Wynk Movies पहिलेच लाँच केले आहे आणि आता एयरटेलने Wynk Games सब्सक्रिप्शन सेवासुद्धा लाँच केली आहे.
एयरटेल आता कंटेट वर अधिक लक्ष देत आहे. म्यूझिक आणि मूव्हीजच्या जगतात आपले नशीब आजमवण्यासोबत आता एयरटेलने Wynk Games सब्सक्रिप्शन सर्विससुद्धा लाँच केली आहे. हा अॅप अजूनसुद्धा बिटा फेजमध्ये आहे आणि २००० पेक्षा जास्त ग्लोबल आणि लोकल गेम्स ऑफर करत आहे.
Wynk Games अॅनड्रॉईड स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्ससाठी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. आणि हा एका प्लेटफॉर्मप्रमाणे काम करेल ज्याच्या माध्यमातून आपण रिलायन्स बिग एंटरटेनमेंट, हंगामा, स्क्वायर एनिक्स, जेपटोलॅब, थम्बस्टार, ट्रेनेसा, बल्किपिक्स आणि नॉटिलस मोबाईल इत्यादींवर आपल्याला गेम्स खेळण्याची संधी मिळेल.
ह्या अॅप्सच्या होम स्क्रीनवर आपल्याला तीन पॅन्स दिसतील, ट्रेंडिंग, लेटेस्ट आणि कॅटेगरी. कॅटेगरी विभागात आपल्याला क्रिकेट, रेसिंग, रोल प्लेइंग, स्ट्रेटेजी आणि सिमुलेशन इत्यादी गेम्स मिळतील. त्याचबरोबर लेटेस्ट विभागात आपल्याला सर्व नवीन गेम्स मिळतील, जे आताच बाजारात आले आहेत. त्याशिवाय ट्रेंडिंग विभागात आपल्याला माहित पडेल की दुस-या यूजर्सला काय पसंत पडतय आणि कोणता गेम्स सर्वात जास्त पसंत केला जातोय.
हे सुद्धा Wynk Music आणि Wynk Movies प्रमाणे एॅड-फ्री आणि सब्सक्रिप्शनवर आधारित आहे. कंपनी आता हा एअरटेलच्या इंटरनेट डेटा पॅकसह मोफत देत आहे. तर इतर यूजर्सला २९ रुपये प्रति महिना ह्या हिशोबाने द्यावे लागतील. त्याचबरोबर ह्या गेम्सला आपण ऑफलाइन माध्यमातूनसुद्धा मोफत खेळू शकता.