एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, फेसबुक मेसेंजरमध्ये सिक्रेट चॅट आणि रिटेल फीचरचा समावेश होणार आहे.
एका रिपोर्टनुसार समोर आले आहे की, फेसबुक मेसेंजरमध्ये सिक्रेट चॅट आणि रिटेल फीचरचा समावेश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक मेसेंजर अॅपला रिटेल हबच्या आत बनविण्याचा विचार चालू आहे. ह्या माध्यमातून लोकांना कुठल्याही वस्तू खरेदी करण्याचे आणि विकायचे स्वातंत्र्य मिळेल.
मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे हा सिक्रेट चॅट्स नक्की असणार तरी काय? फेसबुक मेसेंजरच्या अंतर्गत येणारी टेलिग्राममध्ये अशाच फीचरचा वापर महत्त्वपु्र्ण चॅट्ससाठी केला जाते. आणि त्यामुळे तुमच्याशिवाय इतर कोणीही हा चॅट पाहू शकणार नाही आणि कोणालाही कुठेही कधीच दिसणार नाही.
टेलिग्राम वेबसाइटनुसार, ‘टेलिग्रामच्या सिक्रेट चॅट्सचा वापर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसाठी केला जातो, जो सर्वरवर कोणताही ट्रेस सोडत नाही. हा सेल्फ डिस्ट्रॅक्टिंग मेसेजला सपोर्ट करतो आणि ह्याला फॉरवर्ड केले जाऊ शकत नाही.’
पण फेसबुकचे एक पाऊल यशस्वी होईल का हे मोठे कोडेच आहे. पण ह्यावर जास्त विचार न करता आता जेव्हा हा येईल तेव्हाच याबाबत बोलणे योग्य आहे. तोपर्यंत तुमच्याप्रमाणे आम्हालाही ह्या फीचरची प्रतिक्षा आहे.