मिडिया आणि एन्टरटेनमेंटची मोठी कंपनी Viacom 18 मध्ये भारतात व्हिडियो-ऑन-डिमांड सेवा Voot लाँच केली आहे. ही सेवा Viacom ग्रुप आणि मुकेश अंबानीचे रिलायन्स इंडस्ट्रीजने मिळून सुरु केली आहे. ह्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात नवीन आणि ओरिजनल कॉन्टेंट मिळेल. त्याचबरोबर आपल्याला कॉमेडी आणि ड्रामासुद्धा ह्याच्या माध्यमातून अगदी सहजपणे मिळून जाईल.
त्याशिवाय ह्या प्लेटफॉर्मवर आपल्याला सर्व कार्टून कॅरेक्टरसुद्धा मिळतील, जसे की कॅरेक्टर डोरा, स्पोंगेबोब, मोटू पतलू त्याचबरोबर छोटा भीम आणि पोकिमॉनसुद्धा येथे पाहू शकता. त्याशिवाय ह्यात आपल्याला कॉन्टेंटची एक मोठी लायब्ररीसुद्धा मिळत आहे, जसे Colors, MTV आणि Nick. हे सर्व आपल्याला Voot वर मिळतील. आणि ह्या चॅनल्सचा कॉन्टेंटसुद्धा आपल्याला ह्या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून मिळेल.
Viacom 18 ग्रुपच्या एक्झिक्यूटिव सुधांशू वत्स यांनी सांगितले आहे की, “ह्याच्या माध्यमातून जवळपास ४०० मिलियन इंटरनेट आणि २०० मिलियन स्मार्टफोन्स यूजर्सला नवीन प्लेटफॉर्म मिळाला आहे, जो त्यांना त्यांच्या मनोरंजनाच्या सर्व गोष्टी अगदी सहजपणे देईल आणि ह्या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना खूप चांगले आणि उत्कृष्ट असे साधन मिळणार आहे.”
Voot च्या आधीही भारतात ह्यासारख्या अनेक सेवा सुरु आहेत, जसे की हॉटस्टार, सोनी लाइव्ह, ओजी,एरोसनाउ, स्पूल आणि यपटिव्ही.
हेदेखील वाचा – मेगा मोबाईल सेल: अॅमेझॉनच्या काय आहेत खास ऑफर्स
हेदेखील वाचा – शाओमी लाँच केला 3GB रॅम असलेला रेडमी 3 प्रो