मार्च मॅडनेस बास्केटबॉल टूर्नामेंटला सन्मान देऊन फेसबुकने मेसेंजर अॅपमध्ये एक गेम लपला आहे. जो आपण खेळू शकतो.
आपण सर्वांनी फेसबुकच्या चेस विषयी ऐकले असेल, मात्र ह्यावेळी जर आपण कोणत्या मित्राला एक बास्केटबॉलची इमोजी पाठवली , तर त्यावर टॅप केल्यानंतर एक छोटा बास्केटबॉल गेम चालू होतो.
हा गेम खूपच सोपा आणि उत्कृष्ट आहे. फक्त आपल्याला गेमवर टॅप करावे लागेल आणि त्यानंतर आपण ह्या गेमचा आनंद घेऊ शकता. एका ओळीत १० यशस्वी प्रयत्न केल्यानंतर गेममध्ये असलेले हूप पुढे जाणे सुरु होईल आणि गोष्टी थोड्या कठीण होत जातील. याचाच अर्थ आता आपल्याजवळ कठीण पाडाव येणे सुरु होईल. ह्याच्या पुढे जाण्याने गेम आपल्याला हेच संकेत देतील.
हेदेखील वाचा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग Video
जर आपण बॉलला यशस्वीरित्या बास्केटमध्ये टाकले, तर आपल्याला बक्षीसाच्या रुपात एक इमोजी मिळेल. हे ऐकायला खूप पोरकट वाटतं पण फेसबुक मेसेंजर असेच करणार आहे.
मात्र हा गेम चालू करण्यासाठी आपल्याला मेसेंजरचे नवीन व्हर्जन लागेल. तरच आपण आयओएस आणि अॅनड्रॉईड वर जाऊन ह्याला अपडेट करु शकता. मार्च मॅडनेसची शेवटची मॅच ४ एप्रिलला होणार आहे आणि त्यानंतर हा गेम तेथून हटवला जाईल. तर मग आपल्याला जर हा गेम खेळायचा असेल, तर आपल्याला खूपच घाई करावी लागेल.
हेदेखील वाचा – लावा V2S स्मार्टफोन लाँच, किंमत ७,८९९ रुपये
हेदेखील वाचा – अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स