Motorola ने आपला Motorola E13 बजेट स्मार्टफोन 2023 म्हणजेच या वर्षीच्या सुरुवातीला लाँच केला होता. त्यावेळी, हा स्मार्टफोन हे तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये बाजारात लाँच करणात आला. त्यानंतर आता कंपनीने आपला नवीन कलर व्हेरिएंट बाजारात आणला आहे. होय, लोकप्रिय बजेट स्मार्टफोन नव्या रंगरूपात सादर करण्यात आला आहे. Motorola कंपनीने आपला स्वस्त स्मार्टफोन Moto E13 पुन्हा एकदा नवीन कलर ‘स्काय ब्लू’ ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन लाँच किमतीपेक्षा स्वस्तात मिळू शकतो.
Motorola E13 ची किंमत भारतीय बाजारपेठेत 8,999 रुपये आहे. यावरील उपलब्ध बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Axis, ICICI आणि Kotak Bank च्या मदतीने 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. मात्र, तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये बघू शकता की, डिव्हाइसची फेस्टीव्ह किंमत फक्त 6,749 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart वर आजपासून फोनची सेल सुरू झाली आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
Motorola E13 मध्ये यूजर्सना 6.5 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, 60Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसह Octacore Unisoc T606 प्रोसेसरवर काम करते. यात ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 GPU आहे. यासह स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच, स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी, Moto E13 फोनच्या मागील पॅनलवर F/2.2 अपर्चरसह 13MP प्राइमरी लेन्स देण्यात आली आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी डिव्हाइसमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 10W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसह मोबाइलमध्ये ड्युअल सिम 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, IP52 रेटिंग यांसारखे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत.