जर तुम्ही Vodafone Idea प्रीपेड वापरकर्ते असाल आणि तुमचा प्रीपेड प्लॅन पोस्टपेडमध्ये बदलू इच्छित असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आनंदाची बातमी म्हणजे यासाठी कंपनीने ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यासाठी, कंपनीने ‘P2P कन्व्हर्जन’ सादर केले आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते केवळ OTP व्हेरिफिकेशन वापरून प्रीपेड सिम पोस्टपेडवर पोर्ट करू शकतात. तुमचे Vodafone-Idea प्रीपेड सिम पोस्टपेडमध्ये कसे रूपांतरित करायचे, ते पाहुयात.
तुमचे Vodafone-Idea प्रीपेड कनेक्शन पोस्टपेड ऑनलाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी पुढीलप्रमाणे सोपी प्रक्रिया फॉलो करा:
VI Max पोस्टपेड प्लॅन्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचे फायदे निवडता येतील. तुम्ही प्लॅन्सनुसार OTT सदस्यत्व निवडू शकता. जसे की, प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney + Hotstar, Sony Liv Sun NXT इ, चे सब्स्क्रिप्शन मिळतील. तुम्ही Vi postpaid वर स्विच केल्यास, तुम्हाला तुमच्या आवडीचा फॅन्सी मोबाईल नंबर देखील मिळू शकतो.
VI प्रीपेड वरून पोस्टपेडवर स्विच करताना तुम्ही तुमचे प्रीपेड बॅलेन्स तुमच्या पुढील पोस्टपेड बिलवर क्रेडिट म्हणून सहजपणे पुढे नेऊ शकता. फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये जास्तीत जास्त कुटुंबातील 5 सदस्य जोडू शकता. अशाप्रकारे पोस्टपेडवर स्विच केल्यास तुम्हाला अनेक अप्रतिम बेनिफिट्स मिळतील.