Vodafone Idea प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे? पहा अगदी सोपी प्रक्रिया
Vodafone-Idea प्रीपेड सिम पोस्टपेडमध्ये कसे रूपांतरित करायचे?
Vodafone Idea ने यासाठी कंपनीने 'P2P कन्व्हर्जन' सादर केले आहे.
VI Max पोस्टपेड प्लॅन्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचे फायदे निवडता येतील.
जर तुम्ही Vodafone Idea प्रीपेड वापरकर्ते असाल आणि तुमचा प्रीपेड प्लॅन पोस्टपेडमध्ये बदलू इच्छित असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आनंदाची बातमी म्हणजे यासाठी कंपनीने ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यासाठी, कंपनीने ‘P2P कन्व्हर्जन’ सादर केले आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते केवळ OTP व्हेरिफिकेशन वापरून प्रीपेड सिम पोस्टपेडवर पोर्ट करू शकतात. तुमचे Vodafone-Idea प्रीपेड सिम पोस्टपेडमध्ये कसे रूपांतरित करायचे, ते पाहुयात.
Vodafone Idea प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये ऑनलाईन कसे कन्व्हर्ट करावे?
तुमचे Vodafone-Idea प्रीपेड कनेक्शन पोस्टपेड ऑनलाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी पुढीलप्रमाणे सोपी प्रक्रिया फॉलो करा:
- तुमचे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये बदलण्यासाठी प्रथम VI ॲप/वेबसाइटला भेट द्या. त्यात नवीन कनेक्शन पर्यायातील ‘प्रीपेड टू पोस्टपेड’ ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुमच्या सोयीनुसार पोस्टपेड प्लॅन निवडा आणि Proceed बटणावर क्लिक करा.
- नव्या सिमच्या मोफत होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला तुमचा संपर्क तपशील आणि पत्ता प्रविष्ट करावा लागेल. आपण इच्छित असल्यास, आपण येथे आपल्या पसंतीचा फॅन्सी नंबर निवडू शकता किंवा विद्यमान प्रीपेड नंबरसह कंटिन्यू करू शकता.
- आता तुमचा प्रीपेड नंबर प्रविष्ट करा, जो तुम्हाला पोस्टपेडमध्ये बदलायचा आहे. त्यानंतर OTP प्रविष्ट करा.
- शेवटी तुमचे नवीन Vodafone Idea पोस्टपेड सिम सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला 59059 वर कॉल करावा लागेल.
पोस्टपेड कनेक्शन खरेदी करण्याचे बेनिफिट्स
VI Max पोस्टपेड प्लॅन्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमचे फायदे निवडता येतील. तुम्ही प्लॅन्सनुसार OTT सदस्यत्व निवडू शकता. जसे की, प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney + Hotstar, Sony Liv Sun NXT इ, चे सब्स्क्रिप्शन मिळतील. तुम्ही Vi postpaid वर स्विच केल्यास, तुम्हाला तुमच्या आवडीचा फॅन्सी मोबाईल नंबर देखील मिळू शकतो.
VI प्रीपेड वरून पोस्टपेडवर स्विच करताना तुम्ही तुमचे प्रीपेड बॅलेन्स तुमच्या पुढील पोस्टपेड बिलवर क्रेडिट म्हणून सहजपणे पुढे नेऊ शकता. फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये जास्तीत जास्त कुटुंबातील 5 सदस्य जोडू शकता. अशाप्रकारे पोस्टपेडवर स्विच केल्यास तुम्हाला अनेक अप्रतिम बेनिफिट्स मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile