How to: तुमच्या Airtel प्रीपेडला ऑनलाईनरीत्या घरबसल्या पोस्टपेडमध्ये कसे बदलावे? येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Airtel ग्राहक प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये स्विच करण्यास इच्छुक असल्यास उपयुक्त माहिती
Airtel कडून तुमची ही विनंती अवघ्या काही तासांत पूर्ण होईल.
पोस्टपेड कनेक्शन वापरकर्त्यांना देय तारखेनंतर बिल भरण्यासाठी नेहमीच वाढीव कालावधी मिळतो.
जर तुम्ही देखील Airtel चे प्रीपेड युजर असाल आणि पोस्टपेडमध्ये स्विच करू इच्छित असाल तर, हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि टेक्स्टिंग, डेटा रोलओव्हर, ॲड-ऑन कनेक्शन, हाय इंटरनेट स्पीड आणि फ्री ॲप ऍक्सेस यासारखे अनेक बेनिफिट्स मिळतात. एवढेच नाही तर, पोस्टपेड प्लॅन्स इतर अनेक बेनिफिट्ससह येतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Airtel प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये स्विच करण्याची प्रक्रिया-
ऑनलाईनरित्या Airtel प्रीपेड ते पोस्टपेडमध्ये स्विच कसे करावे?
Airtel प्रीपेडला पोस्टपेड ऑनलाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी तुम्ही Airtel वेबसाइट किंवा Airtel Thanks ॲपची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम Airtel वेबसाइटवर रजिस्टर करा किंवा तुमच्या मोबाइल नंबरसह Airtel Thanks ॲपमध्ये लॉग इन करा.
- आता तुम्हाला होम स्क्रीनवरील मेनूच्या प्रीपेड विभागात ‘प्रीपेड टू पोस्टपेड’ हा ऑप्शन निवडावा लागेल.
- त्यानंतर, तुम्ही येथे कनेक्शन टाईपमध्ये ‘प्रीपेड टू पोस्टपेड’ ऑप्शन सिलेक्ट करा.
- तुमचा प्रीपेड मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचे नाव, पर्यायी क्रमांक टाका आणि OTP द्वारे त्याचे व्हेरिफिकेशन करा.
- येथे ‘कन्फर्म’ किंवा ‘अपग्रेड टू पोस्टपेड’ ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमची विनंती 24 तासांच्या आत पूर्ण केली जाईल आणि एक Airtel ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी येईल. यानंतर, तुमचे ऍड्रेस आणि ID प्रूफ एक्झिक्युटिव्हला द्या.
- या व्हेरिफिकेशननंतर ट्रांजिशन प्रक्रिया अवघ्या तासांत पूर्ण होईल.
एवढेच नाही तर, तुमच्या प्रीपेड प्लॅनवर टॉक-टाइम शिल्लक असल्यास, पहिल्या महिन्यासाठी ते तुमच्या पोस्टपेड बिलामध्ये समायोजित केले जाईल.
पोस्टपेड प्लॅन्सचे फायदे
पोस्टपेड कनेक्शन वापरकर्त्यांना देय तारखेनंतर बिल भरण्यासाठी नेहमीच वाढीव कालावधी दिला जातो. या कालावधीत तुम्हाला सेवा वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पोस्टपेड प्लॅन अनेकदा प्रीपेड प्लॅनपेक्षा जास्त डेटा आणि कॉल सुविधा देतात. तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असल्यास, पोस्टपेड योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अशा अनेक सेवा तुम्हाला पोस्टपेड प्लॅन्समध्ये मिळतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile