BSNL ची सिम खरेदी करताय? ‘अशा’ प्रकारे तपासा, तुमच्या क्षेत्रात चांगले नेटवर्क उपलब्ध आहे की नाही?

Updated on 26-Aug-2024
HIGHLIGHTS

अलीकडेच Airtel, Jio आणि Vodafone Idea प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत.

दरवाढीमुळे कंटाळलेले ग्राहक आता BSNL कडे वळत आहेत.

पुढील सोप्या प्रक्रियेद्वारे तुमच्या क्षेत्रातील BSNL नेटवर्क तपासा.

भारतात जुलै महिन्यात देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone Idea यांनी त्यांच्या प्लॅन्समध्ये दरवाढ केली आहे. जवळपास प्रत्येक ग्राहकाला या दरवाढीचा फटका बसला आहे. या नव्या महागड्या प्लॅनमुळे कंटाळलेले Airtel, Jio आणि VI चे ग्राहक आता एकमेव भारतीय सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळले आहेत. कारण BSNL परवडणाऱ्या किमतीत अनेक बेनिफिट्ससह अप्रतिम प्लॅन्स ऑफर करते.

मात्र, BSNL चे प्लॅन्स परवडणारे असले तरीही प्रत्येक ठिकाणी या कंपनीचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे BSNL ग्राहक बऱ्याच कालावधीपासून नेटवर्कच्या समस्येपासून त्रस्त आहेत. त्यामुळे, तुम्ही देखील BSNL मध्ये स्विच करण्यास इच्छुक असाल तर, आधी तपासून घ्या की तुमच्या क्षेत्रात BSNL चे नेटवर्क उपलब्ध आहेत की नाही. प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

तुमच्या क्षेत्रातील BSNL नेटवर्क कव्हरेज कसे तपासावे?

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये nperf वेबसाइट उघडा.
  • येथे तुम्हाला Map या ऑप्शन दिसले, त्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता शीर्षस्थानी असलेल्या पर्यायामध्ये तुमचा देश ‘भारत’ निवडा.
  • यानंतर, तुम्हाला ज्याचे कव्हरेज पहायचे आहे ते मोबाइल नेटवर्क निवडा.
  • BSNL कव्हरेज तपासण्यासाठी BSNL वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला बॉटमला 6 रंगीत आयकॉन दिसतील. ग्रे आयकॉन कोणतेही नेटवर्क दर्शवत नाही. ब्लु आयकॉन 2G, ग्रीन आयकॉन 3G, ऑरेंज आयकॉन 4G, मरून 4G+ आणि पर्पल आयकॉन 5G नेटवर्क दर्शवतो.
  • आता ‘देश आणि नेटवर्क’च्या खाली तुम्हाला दुसरा सर्च बार दिसेल.
  • या सर्च बारवर जाऊन तुम्ही तुमच्या शहराचे आणि क्षेत्राचे नाव टाका. ‘अशा’ प्रकारे वरील अगदी सोप्या प्रक्रियेद्वारे तुमच्या परिसरात BSNL चे कव्हरेज कसे आहे, हे तपासता येईल.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :