स्पॅम कॉल्स आणि मार्केटिंग कॉल्सच्या संख्येमुळे आपण सर्वजण दररोज त्रस्त होतो. जर तुम्हीही अशीच पद्धत शोधत असाल जी तुम्हाला या त्रासापासून मुक्त करेल. तर आम्ही तुम्हाला या समस्येवर मात करण्यासाठी काही खास आणि उपयुक्त पद्धतींबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही Reliance Jio, किंवा Airtel वापरकर्ते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
हे सुद्धा वाचा : Infinix Smart 7 स्मार्टफोन भारतात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
जर तुम्ही देखील रिलायन्स JIO चे वापरकर्ते असाल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर येणार्या स्पॅम किंवा मार्केटिंग कॉलमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर MyJio ऍपद्वारे DND सेवा ऍक्टिव्ह करा.
– सर्वाप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये MyJio ऍप डाउनलोड करा.
– ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सेटिंगमध्ये जाऊन डू नॉट डिस्टर्ब पर्यायावर टॅप करावे लागेल.
– डू नॉट डिस्टर्ब सेवेवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला कोणाचे मॅसेज आणि कॉल ब्लॉक करायचे आहेत ती कॅटेगरी निवडावी लागेल.
जर तुम्ही AIRTEL वापरकर्ते असाल आणि तुम्हालाही या अवांछित कॉल्सचा त्रास होत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या नंबरवर DND सेवा कशी सक्रिय करता येईल.
– सर्वप्रथम, तुम्हाला एअरटेलच्या अधिकृत साइट airtel.in/airtel-dnd वर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा एअरटेल नंबर टाकावा लागेल.
– मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नंबरवर OTP मिळेल, स्क्रीनवर दाखवलेल्या बॉक्समध्ये OTP टाका.
– OTP टाकल्यानंतर, तुम्हाला ब्लॉक करायची असलेली कॅटेगरी निवडावी लागेल.