जियो जेव्हा पासून बाजारात आली आहे तेव्हा पासून भारतीय टेलिकॉम बाजारात धमाल उडाली आहे. बरेच लोक जे आधी इन्टरनेट चा वापर करत नव्हते, ते पण आता इन्टरनेट चा वापर करत आहेत. पण अनेक लोकांनी आपल्या फोन मध्ये "My Jio" अॅप डाउनलोड नाही केला आहे आणि ते बिना अॅप जाणून घेऊ इच्छितात की त्यांचा चालू जियो प्लान कधी संपणार आहे.
आता या समस्येवर पण उपाय मिळाला आहे. कारण जियो यूजर्स फक्त एका नंबर वर कॉल करुन जाणून घेऊ शकतात की त्यांचा जियो प्लान केव्हा संपणार आहे. सोबत त्यांना हेही समजेल की, त्यांनी आज किती डेटा वापराला आहे आणि त्यांची रोजची डेटा लिमिट काय आहे.
हे करण्यासाठी यूजरला फक्त आपल्या जियो नंबर वरून "1299" वर कॉल करावा लागेल. जेव्हा तुम्ही या नंबर ला कॉल कराला तेव्हा तुमच्या फोन वरून एक रिंग जाईल आणि त्यानंतर फोन आपोआप कट होईल आणि तुम्हाला तुमच्या जियो नंबर वर एक मेसेज येईल. ज्यात तुमच्या प्लान बद्दल काही माहिती दिली जाईल. जसे तुमची रोजची डेटा लिमिट काय आहे आणि तुम्ही किती रुपयांचा रिचार्ज केला होता तसेच तुमचा प्लान कधी संपणार आहे.