Tech Tips: दीर्घकाळ टिकेल तुमच्या फोनचा इंटरनेट डेटा! फोनमध्ये करा फक्त ‘या’ छोट्या सेटिंग्स, पहा कसे?

Updated on 02-Sep-2024
HIGHLIGHTS

फोनचा दैनंदिन डेटा लवकर संपतोय? पुढील टिप्सद्वारे या समस्येचे निराकरण करा.

फोनमधील डेटा नियंत्रित करण्यासाठी फोनच्या ब्राउझर सेटिंग्जमध्ये 'हा' बदल करा.

फोनमधील डेटा नियंत्रित करण्यासाठी दुसरी महत्त्वाची सेटिंग देखील करावी लागेल.

Tech Tips: 5G चे युग सुरु झाल्यापासून सर्व युजर्सना वेगवान इंटरनेट डेटा चालवण्याची सवय झाली आहे. बहुतांश लोक आता 5G स्मार्टफोन वापरत आहे. पण नवे नेटवर्क आल्यापासून अनेक युजर्सची ही तक्रार आहे की, त्यांच्या फोनचा दैनंदिन डेटा लवकरच संपतो. जर तुम्हाला देखील ही समस्या असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, पुढील उपाय नक्कीच करून पहा.

Also Read: BSNL ची सिम खरेदी करताय? ‘अशा’ प्रकारे तपासा, तुमच्या क्षेत्रात चांगले नेटवर्क उपलब्ध आहे की नाही?

‘ही’ सेटिंग ब्राउझरमध्ये करा.

फोनमधील डेटा नियंत्रित करण्यासाठी फोनच्या ब्राउझर सेटिंग्जमध्ये जावे लागेल. यानंतर डेटा सेव्हर किंवा सेव्हिंग डेटा मोड ऑन करा. ब्राउझर सेटिंग्जमधील ‘पिक्चर’ ऑप्शन बंद करा. असे केल्याने वेब पेजचा फोटो डाउनलोड करण्यास वेळ लागेल, परंतु डेटाचा वापर कमी होईल. यासह, ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये जा आणि ‘बॅकग्राउंड डेटा’ ऑप्शन ऑफ करा.

बॅकग्राउंड ॲप बंद करा.

फोनमधील डेटा नियंत्रित करण्यासाठी दुसरी सेटिंग करावी लागेल. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला सर्चमध्ये ‘App’ सर्च करावे लागेल आणि त्यानंतर ॲप ऑप्शनवर जाऊन बॅकग्राउंड ॲपवर जाऊन ॲप बंद करावे लागेल.

ऑटो प्ले व्हिडिओ बंद करा.

सर्वप्रथम तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल, त्यानंतर डेटा सेव्हर मोड सर्च करा. यानंतर ऑटो प्ले व्हिडिओचा पर्याय ऑफ करा. याद्वारे फोनवर व्हिडिओ स्क्रोल करताना व्हिडिओ स्वतः प्ले होणार नाही. अनेक फोनमध्ये ॲप अपडेट्स ऑटो मोडमध्ये काम करतात, हा ऑप्शनही ऑफ केला जाऊ शकतो. यासाठी Google Play Store किंवा Apple Play Store वर जा. त्यानंतर ॲप अपडेट ऑप्शनवर जा आणि ऑटो अपडेट बंद करा.

स्मार्टफोनमध्ये ‘हा’ बदल करा.

स्मार्टफोनमधील डेटा वापर नियंत्रित करण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. यानंतर नेटवर्क आणि इंटरनेटच्या ऑप्शनवर जा. मोबाइल नेटवर्कवर जा आणि कमी डेटा वापराचा पर्याय निवडा. अशाप्रकारे, फोनच्या डेटाचा वापर कमी सहज कमी होईल.

तुमच्या फोनचा दैनंदिन डेटा देखील लवकर संपतो का? तुमच्या फोनमध्ये या सेटिंग्स केल्याने डेटा नियंत्रित केला जाईल. सोप्या Tips द्वारे तुमच्या फोनच्या समस्येचे निराकरण करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :