Smartphone Buying Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी घ्या तपासून, अन्यथा होईल पश्चाताप

Updated on 22-Aug-2024
HIGHLIGHTS

स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला अनेक महत्त्वाच्या तपासून घेणे आवश्यक आहे.

5G नेटवर्कचे युग सुरू झाले आहे. अशात, केवळ 5G सपोर्ट असलेल्या फोनला प्राधान्य द्या.

तुम्हाला फोटोग्राफी आवडत असल्यास, कॅमेरा गुणवत्ता, लेन्स आणि मेगापिक्सेलकडे लक्ष द्या.

Smartphone Buying Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, स्मार्टफोन आता प्रत्येकाची गरज बनली आहे. एका ठिकाणी राहून संपूर्ण जगाशी कनेक्ट राहण्याचे काम फक्त आपल्या हातातील स्मार्टफोनद्वारे होते. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन मार्केट खूप स्पर्धात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला अनेक महत्त्वाच्या तपासून घेणे आवश्यक आहे. कारण स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी बजेटचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यामुळे, तुम्हाला नंतर पश्चाताप व्हायला होऊ नये, यासाठी पुढील महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्या.

हे सुद्धा वाचा: Jio ने TV साठी लाँच केला JioTV+ ॲप! 2-इन-1 ऑफरसह मिळेल बरेच काही, वाचा डिटेल्स

5G आणि कनेक्टिव्हिटी: 5G नेटवर्कचे युग सुरू झाले आहे. अशात, केवळ 5G सपोर्ट असलेल्या फोनला प्राधान्य द्या. फोन खरेदी करताना ब्लूटूथ 5.0, NFC आणि Wi-Fi 6 सारखे इतर कनेक्टिव्हिटी पर्याय देखील लक्षात ठेवा.

सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्योरिटी: फोन कंपनी किती लवकर आणि किती वेळा सॉफ्टवेअर अपडेट पुरवते, हे तपासणे देखील एवढ्या आहे. तसेच, सिक्योरिटी पॅच देखील तपासून घ्या.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: प्रोसेसर फोनचा वेग आणि मल्टीटास्किंग क्षमतेसाठी असते. तुम्ही गेमिंग किंवा हेवी ॲप्लिकेशन्स वापरत असाल तर तुम्ही हाय-एंड प्रोसेसर असलेला फोन निवडणे आवश्यक आहे.

बिल्ड कॉलिटी आणि डिझाइन: फोनची डिझाईन, मटेरियल इ. कडेही लक्ष देणे, आवश्यक आहे. याशिवाय वॉटरप्रूफिंग (IP रेटिंग) देखील महत्त्वाचे आहे.

कॅमेरा कॉलिटी: प्रत्येक जण कॅमेरा कॉलिटी पाहून फोन सिलेक्ट करतो. कामासाठी देखील कॅमेरा आजच्या जगात खूप महत्त्वाचा झाला आहे. तुम्हाला फोटोग्राफी आवडत असल्यास, कॅमेरा गुणवत्ता, लेन्स आणि मेगापिक्सेलकडे लक्ष द्या. मल्टिपल कॅमेरा सेटअप (वाइड-एंगल, मॅक्रो, टेलिफोटो) हा देखील चांगला पर्याय असू शकतो.

बॅटरी लाइफ: फोन खरेदी करताना, बॅटरी क्षमता आणि जलद चार्जिंग सपोर्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही दिवसभर किंवा त्याहून अधिक काळ फोन वापरत असाल, तर किमान 4000mAh क्षमतेचा फोन निवडणे गरजेचे आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :