जवळपास प्रयेकजण आता स्मार्टफोनचा वापर करतो. आज Smartphone लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याबरोबरच, आता फोनला आग लागल्याच्या किंवा फोन ब्लास्ट झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. फोनला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात. यात प्रामुख्याने बॅटरीशी संबंधित समस्या आणि तांत्रिक त्रुटी यांचा समावेश असतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला फोनच्या बॅटरीला आग लागण्याची मुख्य कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगणार आहोत.
Also Read: BSNL च्या युजर्ससाठी मोठी खुशखबर! नवे महत्त्वाचे फीचर लाँच, स्पॅम कॉल्सपासून मिळेल त्वरित सुटका
कधीकधी फोनचे सॉफ्टवेअर बॅटरीचे योग्य व्यवस्थापन करू शकत नाही. ज्यामुळे फोन जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते. यामुळे बॅटरीवर देखील ताण येतो आणि आग लागू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेटचे नोटिफिकेशन आल्यावर लगेच अपडेट करा.
जर फोन जास्त वापरला गेला असेल किंवा जास्त वेळ चार्ज केला असेल तर, अशा कारणांनी फोन गरम होऊ शकतो. विशेषत: जेव्हा फोन हाय परफॉर्मन्स ऍप्लिकेशन्ससाठी वापरला जातो. किंवा उष्णतेमध्ये वापरला जातो तेव्हा फोनला आग लागण्याची शक्यता वाढते. फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नका.
फोन खाली पडणे किंवा त्यावर प्रेशर आल्यामुळे बॅटरी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक भाग खराब होऊ शकतात. अशा कारणांनी शॉर्ट सर्किट होऊ शकते. हे शॉर्ट सर्किट फोनला आग लागण्याचे मोठे कारण असू शकते.
लिथियम-आयन बॅटरी बहुतेक स्मार्टफोन्समध्ये वापरल्या जातात. जर बॅटरी जास्त चार्ज झाली असेल, जीर्ण झाली असेल किंवा त्यात बिघाड आला असेल, तर ती जास्त उष्णता निर्माण करेल. ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.