Tech Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, स्मार्टफोन आजच्या युगात किती महत्त्वाचा झाला आहे. त्याबरोबरच, या Smartphone मध्ये अधिकाधिक वैयक्तिक डेटा स्टोअर केला जातो. कारण आपल्याला कधीही आणि कोणत्याही ठिकाणी या डेटाचा उपयोग असतो. मात्र, डिजिटल युगात तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
होय, लोकांना आपला बळी बनवण्यासाठी हॅकर्स नवनवीन पद्धती वापरत आहेत. तुमचा वैयक्तिक डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता आणि फसवणूक करणारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.
Also Read: Tech Tips: Smartphone ला आग लागण्याची ‘ही’ आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या बचाव करण्याचे उपाय
आजकाल सर्व ठिकाणी सार्वजनिकWi-Fi बसवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, प्रवास करताना ट्रेनमध्ये देखील पब्लिक Wi-Fi ची सुविधा देण्यात येते. यासह कनेक्ट करून तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. मात्र, यासह तुमच्या वैयक्तिक डेटा चोरीचा धोका असतो. त्यामुळे, पब्लिक Wi-Fi चा वापर न करण्याचा प्रयत्न करा. विशेषत: ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी हे अजिबात करू नका. या सर्व कामांसाठी तुमचा मोबाईल डेटाचाच वापर करा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच (2FA) अतिरिक्त सुरक्षा स्तर प्रदान करते. याचा वापर केल्याने डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील. यासह हॅकर्स आणि स्कॅमर देखील तुमच्या डेटामध्ये ऍक्सेस करू शकणार नाहीत.
सर्व टेक कंपन्या त्यांच्या उपकरणांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सतत सॉफ्टवेअर अपडेट जारी करतात. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी पॅच असतात, ज्यामुळे तुमच्या फोनमधील कुठलाही डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्हाला तुमचा डेटा सुरक्षित ठेवता येईल.
VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क होय. VPN ची विशेषता म्हणजे हे इंटरनेट वापरताना तुमचा IP ॲड्रेस लपवून ठेवतो. याद्वारे तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित राहतो, तसेच हॅकर्सही दूर राहतात. VPN चा वापर करून तुम्ही डिजिटल युगात स्वतःला सुरक्षित ठेवण्यास सक्षम असाल.