अगदी वैताग आणतात Smartphone चे कॉमन ‘5’ प्रॉब्लम्स, येथे वाचा सोल्युशन्स…

अगदी वैताग आणतात Smartphone चे कॉमन ‘5’ प्रॉब्लम्स, येथे वाचा सोल्युशन्स…
HIGHLIGHTS

Smartphone चे 5 कॉमन प्रॉब्लम्स

यासाठी फोन सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्याची गरज नाही.

घरबसल्या या समस्यांचे निराकरण करा

स्मार्टफोनमध्ये अशी अनेक टेक्निकल फीचर्स देण्यात आली आहेत, जी वापरकर्त्याला प्रत्येक कामात मदत करतात. अनेक वेळा फोनमध्ये अशा समस्या येतात ज्यामुळे स्मार्टफोनचा परफॉर्मन्स मंदावतो किंवा खराब होतो. अशा परिस्थितीत, आपण घरबसल्या या समस्या सोडवू शकता. 

हे सुद्धा वाचा : Valentine’s Day साठी Jio ची आकर्षक ऑफर, मोफत जेवणासह फ्लाइट्सवर सूट आणि बरेच काही…

ओवरहीटिंग 

जर फोन खूप गरम झाला असेल तर तुमच्या फोनचे तापमान सामान्य करण्यासाठी त्याला सूर्याच्या उष्णतेपासून दूर ठेवा. याशिवाय फोन नेहमी रिफ्रेश करत राहा. स्मार्टफोनवर जास्त लोड देऊ नका, वेळोवेळी फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला मार्ग आहे.

बॅटरी लाईफ कमी होणे 

जर तुमच्या फोनची बॅटरी लाइफ कमी झाली असेल तर सर्वप्रथम फोन स्क्रीनची ब्राइटनेस कमी करा. तुम्ही GPS, Wi Fi आणि ब्लूटूथ वापरत नसल्यास ते बंद करा. तुमच्या फोनचा बॅटरी सेविंग मोड सक्षम करा. याशिवाय फोन सेटिंग्जमध्ये बॅटरीचा वापर तपासा. कोणते ऍप जास्त बॅटरी वापरत आहे, हे येथे बघा. ऍप वापरात नसाल तर डिलीट करा.

स्लो परफॉर्मन्स 

स्मार्टफोन क्लियर ​​करणे खूप महत्वाचे आहे. वापरात नसलेल्या फाईल्स किंवा ऍप्स डिलीट करा. जे ऍप्स नीट काम करत नाहीत किंवा फोनला सपोर्ट करत नाहीत ते डिलीट करा. याशिवाय, तुमचा सर्व डेटा ड्राइव्हवर अपलोड करा. फोनची स्पेस मोकळी ठेवा, जर तुम्हाला जास्त समस्या येत असतील तर फोन डेटाचा बॅकअप घ्या आणि फोन रिस्टोअर करा.

स्टोरेज फूल होणे

स्टोरेज भरल्यावर, तुम्ही अनावश्यक किंवा अतिरिक्त फाइल्स आणि ऍप्स काढून टाकल्या पाहिजेत. तुम्ही जुने कॉल आणि टेक्स्ट मॅसेज देखील हटवू शकता. काही फाईल्स जास्त महत्त्वाच्या असतील तर त्या ड्राइव्हवर ट्रान्सफर करता येतात. या स्टेप्सच्या मदतीने फोनची स्पेस मोकळी होईल. याशिवाय तुम्ही SD कार्ड देखील वापरू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo