मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 सादर केला. ९ मार्चला ह्या फोनची पहिला फ्लॅश सेल झाला होता. त्यानंतर दुसरा सेल १६ मार्चला झाला. आणि आता ह्या फोनचा फ्लॅश तिसरा सेल आज दुपारी २ वाजल्यापासून सुरु होईल.
हे फोन अॅमेझॉन आणि mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध होते. रेडमी नोट 3चे दोन्ही प्लेटफॉर्मवर आउट ऑफ स्टॉक झाले आहेत. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पण त्यांना आज आणखी एक संधी मिळणार आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया साइटवरुन बुक करण्याची कृती सांगणार आहोत..
दुपारी २ वाजता हा सेल सुरु होणार आहे. त्यामुळे हा सेल सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे आधी Amazon.in वर लॉग इन करा. कृपया तुमचे पेमेंट करण्यासाठी लागणा-या गोष्टी जसे की, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुमच्या जवळ ठेवा, जेणेकरुन तुम्ही त्वरित तुमची पेमेंट कृती कराल.
जेव्हा सेलला सुरुवात होईल तेव्हा रेडमी नोट 3 तुमच्या कार्टमध्ये जोडा आणि त्या प्रोडक्टचे सर्व फीचर्स १५ मिनिटांच्या आत तपासून चेकआऊट करा. जर तुमची ऑर्डर यशस्वीरित्या पुर्ण झाली तर तुम्हाला इतर कोणतीही कृती करण्याची गरज नाही.
जर तेथे आधीच इतर ग्राहकांनी रेडमी नोट 3 त्यांच्या कार्टमध्ये जोडला असेल, तर तुम्हाला join a Waitlist असे सांगतील. आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ की, ती वेटिंगलिस्ट जॉईन करा. जर त्याचा मूळ खरेदीदार १५ मिनिटात ऑर्डर क्रिया पूर्ण करण्यास अयशस्वी ठरला, तर तो स्मार्टफोन वेटिंगलिस्टवर असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.
जर तुम्ही वेटिंगलिस्टमध्ये असाल, तर त्यासंबंधीचा अलर्ट तुमच्या स्क्रीनवर येईल, आणि तेथे ‘Add to Cart’ बटन सक्रिय झालेले दिसेल, त्यासाठी तुम्हाला वारंवार ते बटन सक्रिय होते का हे पाहावे लागेल.
तुम्हाला हा स्मार्टफोन तुमच्या कार्टमध्ये जोडण्यासाठी ३ मिनिटे मिळतील आणि तुमची खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १५ मिनिटे मिळतील.
जर तुम्हाला वेटलिस्ट फुल झालेली दिसली तरी आमचा सल्ला असेल की, मिनिटा-मिनिटांनी ते पेज रिफ्रेश करत राहा.शेवटी शेवटी कदाचित तुम्हाला तो उपलब्ध झालेला दिसू शकतो.
आम्हाला खात्री आहे की, आम्ही दिलेल्या ह्या सोप्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील.
हेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला अॅप्पल आयपॅड प्रो टॅबलेट लाँच
हेदेखील वाचा – ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास