तुमच्या लॅपटॉपची बॅटरीदेखील लवकर संपते का? ‘या’ सोप्या ट्रिक्स करून बघा
लॅपटॉप चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजनल चार्जर वापरा.
बॅटरी सेव्हर मोड ऍक्टिव्हेट करा.
गरज नसताना ब्लु-टूथ आणि WiFi बंद ठेवा.
कोरोनाच्या महामारीनंतर सामान्य जीवनात बरेच बदल झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात काम करण्याची एक नवीन पद्धत समोर आली आहे, ती म्हणजे 'वर्क फ्रॉम होम' वर्क मॉडेल होय. लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसचं कोणतंही काम घरून करण्यात लॅपटॉपने खूप मदत केली आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्या आयुष्यात लॅपटॉप अतिशय महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी घरून काम करण्यासाठी किती आवश्यक आहे, याची जाणीव आपल्याला आता झाली आहे.
कारण घरून काम करताना बरेचदा इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे तुमच्या कामात खंड पडतो. पुढील काही दिवसांत पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जाण्याची समस्या असते. त्यामुळे काम करताना जर सारखी लॅपटॉपची बॅटरी संपत असेल, तर कामात खंड पडतो. लॅपटॉपची बॅटरी उत्तम असल्यास आपल्याला जास्त वेळ बॅकअप मिळू शकतो. यासाठी योग्य ती काळजी घेतली, तर बॅटरी बॅकअप जास्त मिळण्याची शक्यता आहे. पुढीलप्रमाणे काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर, लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवता येईल.
नेहमी ओरिजनल चार्जर वापरा
लॅपटॉप किंवा फोन चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजिनल चार्जरचा वापर करा. कारण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाइससाठी ओरिजिनल चार्जर जे काम करतो, ते डुप्लिकेट चार्जर करू शकत नाही. तुम्ही नेहमी ओरिजिनल चार्जरचा वापर केला तर लॅपटॉपचे बॅटरी लाइफ वाढेल आणि तुमचं डिवाइस सुरक्षित राहील.
बॅटरी सेव्हर वापरणे
मोबाइल वापरताना आपण अनेकदा बॅटरी सेव्हर हा पर्याय वापरत असतो. मात्र, क्वचितचं लोकांना हे माहिती असेल की, लॅपटॉप किंवा टॅब्लेटमध्येदेखील बॅटरी सेव्हर हा पर्याय उपलब्ध असतो. हा पर्याय Extra Battery Backup म्हणजेच दीर्घकाळ बॅटरी टिकवण्याची सुविधा देतो. तुम्हाला तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाईफ बॅटरी सेव्हर पर्याय वापरून देखील वाढवता येईल. त्यामुळे बॅटरीचा वापर कमी होण्यास लगेच सेटिंग बदला, यामुळे लॅपटॉप बॅटरी सेव्हर मोडवर सुरू होईल. मात्र, बॅटरी सेव्हर अॅक्टिव्हेट केल्यास तुमच्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे.
डिस्प्लेची काळजी घ्या
तुम्हाला तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर, लॅपटॉपचा ब्राइटनेस कमीत कमी ठेवा. मात्र, तो जास्त प्रमाणात कमी ठेऊ नका. तुमच्या डोळ्यांवर ताण येणार नाही याची खबरदारी घ्या.
ब्लू-टूथ/WiFi बंद ठेवा
ब्लू-टूथ किंवा WiFi चा वापर केल्यानंतर ते बंद करायला विसरू नका. हे फीचर्स मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरतात. त्यामुळे जेव्हा लॅपटॉपवर ब्लू-टूथ आणि WiFi आवश्यक नसेल तेव्हा ते बंदच ठेवा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile