Tech Tips: सावधान! फक्त तुम्हालाच नाही तर यांच्याकडेही जातो तुमचा OTP, ‘अशा’प्रकारे ताबडतोब करा बंद

कुठल्याही व्हेरिफिकेशन किंवा ऑथेंटिकेशन प्रक्रियेमध्ये OTP ची महत्त्वाची भूमिका असते.
तुमच्या फोनमध्ये असलेले अनेक ऍप्स तुमच्या फोनवर येणारा OTP वाचू शकतात.
जाणून घ्या OTP वाचणारे Apps रिमूव्ह करण्याची प्रक्रिया
Tech Tips: आपणा सर्वांना माहितीच आहे की, कुठल्याही व्हेरिफिकेशन किंवा ऑथेंटिकेशन प्रक्रियेमध्ये OTP म्हणजेच वन टाइम पासवर्डची महत्त्वाची भूमिका असते. पडताळणीसाठी हा OTP तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर येतो. नंबर पडताळणीसाठी तसेच मोठ्या व्यवहारांसाठी OTP खूप उपयुक्त आहे. मात्र, फसवणुकीची प्रकरणे आणि स्कॅम्ससारख्या घटनांमुळे OTP कुणासोबतही शेअर करू नये, अशा सूचना आपल्याला नेहमीच मिळत असतात.
Also Read: Smartphones Tips: DND वर असताना महत्त्वाचे कॉल मिस होणार नाही! फोनमध्ये करा ‘ही’ छोटीशी सेटिंग
मात्र, जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमच्या फोनवर येणारा OTP कोड तुम्ही एकटेच वापरत आहात. तर, तुमचा गोड गैरसमज होतोय. लक्षात घ्या की, तुमच्यासोबतच तुमच्या फोनमध्ये असलेले अनेक ऍप्स तुमच्या फोनवर येणारा OTP वाचत आहेत. हे अॅप्स तुमचा ओटीपी गुप्तपणे वाचतातच आणि त्याचा गैरवापर देखील करू शकतात.
OTP वाचणारे Apps रिमूव्ह करण्याची प्रक्रिया
जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक OTP चा गैरवापर होऊ नये, असे वाटत असेल तर, पुढील प्रक्रिया लगेच करा. अशामध्ये, तुमच्या फोनवर येणारे SMS वाचणाऱ्या ऍप्सची यादी तुम्ही ताबडतोब काढून टाकावी. फोनमध्ये असलेल्या सेटिंगद्वारे, तुम्ही तुमच्या मेसेज बॉक्समध्ये येणारे SMS वाचणाऱ्या ऍप्सची यादी पाहू शकता.
- सर्वप्रथम तुमच्या फोनमधील Settings ओपन करा. आता खाली स्क्रोल करून Security and Privacy च्या ऑप्शनवर जावे लागेल.
- आता बॉटमला असलेल्या Privacy Dashboard पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर प्रायव्हसी डॅशबोर्ड उघडेल. येथे See Other Permissions पर्यायावर क्लिक करा.
- येथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बॉटमला SMS पर्याय दिसेल.
- या पर्यायावर गेल्यावर तुम्हाला तुमचे मेसेज वाचणाऱ्या सर्व ऍप्सची यादी दिसेल.
आता महत्त्वाचे लक्षात घ्या की, जर या यादीत असे कोणतेही थर्ड-पार्टी ऍप असेल, जे तुम्हाला OTP वाचायला नको असतील, तर तुम्ही ते बंद करा. हे बंद करण्यासाठी तुम्हाला फक्त यादीतील त्या अॅपवर टॅप करायचे आहे. त्या अॅपवर टॅप केल्यानंतर, Dont Allow ऑप्शनवर क्लिक करा. अशाप्रकारे ते ऍप्स तुमचे SMS आणि OTP वाचू शकणार नाहीत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile