अशी मिळवू शकता तुम्ही आसपास असलेल्या आधार एनरोलमेंट सेंटर्स ची माहिती..

अशी मिळवू शकता तुम्ही आसपास असलेल्या आधार एनरोलमेंट सेंटर्स ची माहिती..
HIGHLIGHTS

ऑनलाइन आधार एनरोलमेंट सेंटर्स शोधण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in/ वेबसाइट वर जावे लागेल.

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. भारत सरकार नुसार, प्रत्येक नागरिकाने आपला आधार नंबर बँक अकाउंट्स, पॅन कार्ड आणि मोबाइल नंबर इत्यादी शी लिंक करणे अनिवार्य आहे. आधार 12 अंकी युनीक कोड आहे. 

दोन गोष्टींसाठी आधार सेंटर्स शोधण्याची गरज पडते. एक, जर तुम्हाला कोणाची तरी नवीन एनरोलमेंट करायची आहे आणि दुसरी म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे आहेत. ऑनलाइन आधार एनरोलमेंट सेंटर्स शोधण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in/ वेबसाइट वर जावे लागेल.

इथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील- स्टेट, पिन कोड आणि सर्च बॉक्स

स्टेट
स्टेट या पर्याया ने सर्च केल्यास तुम्हाला लिस्ट मिळेल ज्यात ड्रॉप डाउन करून तुम्हाला माहिती टाकावी लागेल. जी हवी ती माहिती टाकल्यानंतर वेरिफिकेशन कोड टाकून सर्च बटन वर क्लिक करावे लागेल.   
 
पिन कोड
या पर्यायाने सर्च करताना तुम्हाला तुमचा एरिया पिन कोड टाकावा लागेल आणि वेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर सर्च बटन वर क्लिक करावे लागेल.  

सर्च बॉक्स
सर्च बॉक्स मधून माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहराचं नाव लिहून वेरिफिकेशन कोड टाकून माहिती मिळवू शकता.  
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo