ऍड्रेस प्रूफशिवाय Aadhar कार्डमध्ये बदलता येईल पत्ता , फक्त ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा…

Updated on 04-Jan-2023
HIGHLIGHTS

घरबसल्या आधार कार्डमधील ऍड्रेस बदला.

ऍड्रेस प्रूफशिवाय सहज होईल हे काम.

यासाठी, तुम्हाला फक्त 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

आजकाल Aadhar  कार्ड हा ओळख पुराव्याचा (आयडेंटिटी प्रूफ) सर्वात महत्त्वाचा कागद बनला आहे. प्रत्येक सरकारी-खाजगी कामात आधार कार्डाची गरज वाढत आहे. परंतु, तुम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट करता आणि तुमच्याकडे त्या जागेशी कोणताही पत्ता पुरावा जोडलेला नसतो, तेव्हा समस्या येते. आता ही समस्या सोडवण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन  अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने नवीन नियम 'आधार कार्ड ऍड्रेस चेंज नियम' लागू केला आहे. यामुळे, आता तुम्ही ऍड्रेस प्रूफशिवाय तुमचा आधार कार्ड पत्ता बदलू शकता. 

हे सुद्धा वाचा : BSNL ग्राहकांना झटका ! बंद केले दोन अप्रतिम बेनिफिट्ससह येणारे स्वस्त प्लॅन्स

कुटुंब प्रमुखाची परवानगी

 आधार कार्ड ऍड्रेस चेंज नियमानुसार, तुम्हाला तुमच्या आधारमधील पत्ता बदलण्यासाठी कुटुंब प्रमुखाची (HoF) परवानगी घ्यावी लागेल. आधार पत्ता बदलला जाईल जर कुटुंब प्रमुखाने त्याच्या/तिच्या जोडीदार, मुले आणि पालक यांच्यातील नवीन पत्त्याला मान्यता दिली. विशेष बाब म्हणजे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती कुटुंब प्रमुख (HOF) असू शकते. या बदलानंतर लोकांना पत्ता बदलण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही आणि त्यांचे आधार कार्ड सहज अपडेट होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

आधार कार्डमध्ये 'अशा' प्रकारे बदला तुमचा पत्ता :

– सर्वप्रथम, तुम्हाला आधार https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

– वेबसाइट ओपन केल्यावर तुम्हाला आधार ऍड्रेस अपडेटचा पर्याय दिसेल.

– यानंतर, तुम्हाला तेथे तुमच्या कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक लिहावा लागेल.

– त्यानंतर वेबसाइटवरून HOF च्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण केले जाईल. यानंतर तुम्हाला रिलेशनशिप पेपरचा पुरावा विचारला जाईल.

– हा पुरावा सादर केल्यानंतर, तुमचे HOF प्रमाणीकरण केले जाईल. यानंतर, तुम्हाला 50 रुपये सेवा शुल्क ऑनलाइन जमा करावे लागेल.

– हे पेमेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर येईल, जो तुम्हाला वेबसाइटवर लिहावा लागेल. यानंतर HOF ला त्याच्या पत्त्याची विनंती करावी लागेल.

–  ही विनंती मिळाल्याचा संदेश मिळाल्यावर, HOF ओके लिहून त्याची परवानगी देईल. त्यासाठी त्याला 30 दिवसांचा अवधी मिळणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पत्ता आधारमध्ये अपडेट केला जाईल.

– हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर कुटुंबाचा प्रमुख म्हणजेच HOF ने पत्ता बदलण्याची विनंती नाकारली तर आधारमध्ये पत्ता बदलणे शक्य होणार नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :