WhatsApp हे जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया ऍप आहे. या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फीचर्स जोडण्यात आली आहेत, जी वापरकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. यापैकी एक कस्टम रिंगटोन देखील आहे. या फीचरच्या मदतीने निवडक कॉन्टॅक्ट्सच्या इनकमिंग कॉल्स आणि मॅसेजसाठी वेगळे रिंगटोन सेट केले जाऊ शकतात. जर तुम्हाला व्हॉट्सऍपवर तुमच्या खास कॉन्टॅक्ट्ससाठी वेगळी रिंगटोन सेट करायची असेल, तर या सोप्या स्टेप्स फॉलो करा…
हे सुद्धा वाचा : Noise चे GPS-सक्षम स्वस्त स्मार्टवॉच लाँच, किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी…
– WhatsApp उघडा आणि चॅट सेक्शनमध्ये जा.
– तुम्ही ज्यांच्यासाठी वेगळा मॅसेज टोन सेट करू इच्छिता तो संपर्क निवडा.
– आता संपर्काच्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि वॉलपेपर अँड साउंड निवडा.
– येथे तुम्ही तुमच्या आवडीचा टोन सेट करू शकता.
– WhatsApp उघडा आणि चॅट्स टॅबवर जा.
– येथून तुम्ही ज्यांच्यासाठी वेगळी रिंगटोन सेट करू इच्छिता तो संपर्क निवडा.
– त्यानंतर, संपर्काच्या नावावर क्लिक करा आणि त्याच्या प्रोफाइलवर जा.
– खाली स्क्रोल करा आणि कस्टम नोटिफिकेशनवर टॅप करा.
– आता Use custom notification वर क्लिक करा.
हे केल्यानंतर, रिंगटोनवर क्लिक करा आणि आपल्या आवडीची रिंगटोन निवडा आणि सेट करा.
अशा प्रकारे तुम्ही निवडलेल्या संपर्कांसाठी भिन्न रिंगटोन सेट करू शकता.