WhatsApp मॅसेज शेड्यूल करणे आहे खूप सोपे, जाणून घ्या खास युक्ती…

WhatsApp मॅसेज शेड्यूल करणे आहे खूप सोपे, जाणून घ्या खास युक्ती…
HIGHLIGHTS

WhatsApp वर संदेश शेड्यूल करण्यासाठी कोणतेही फिचर नाही.

वापरकर्ते वेगळ्या ऍपद्वारे WhatsApp मॅसेज शेड्यूल करू शकतात.

तुम्ही शेड्युल मॅसेज पाठवण्याआधी चेक देखील करू शकता.

WhatsAppवर सर्व मजकूर मॅसेज पाठवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. ऍपवर मल्टीमीडिया फाइल्सवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल पाठवण्याची सुविधा मिळते. मात्र, अनेकवेळा असे घडते की आपल्याला एखाद्याला महत्त्वाचा मॅसेज पाठवायचा आहे, परंतु काही कारणास्तव आपण मॅसेज पाठवायला विसरतो. अशा परिस्थितीत प्लॅटफॉर्मवर शेड्युल फीचर असेल तर काम खूप सोपे होईल. 

हे सुद्धा वाचा : Nothing Phone (1) 10 हजारांनी स्वस्त, बघा कुठे मिळतेय भारी ऑफर…

मॅसेज शेड्युलिंग फीचर सध्या WhatsApp वर उपलब्ध नाही. पण एक युक्ती आहे, ज्याच्या मदतीने मॅसेज शेड्यूल केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला मॅसेज कसे शेड्यूल करायचे ते सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. 

– सर्व प्रथम Google Play-Store वर जा.

– या प्लॅटफॉर्मवरून SKEDit ऍप डाउनलोड करा.

– ऍप उघडा आणि लॉग-इन प्रक्रिया पूर्ण करा.

– आता मेनूमधून WhatsApp निवडा आणि एनेबल ऍक्सेसिबिलीटीवर टॅप करा.

– यानंतर टॉगलवर क्लिक करा आणि Allow पर्यायावर क्लिक करा.

– त्यानंतर मॅसेज, डेट आणि टाइम एंटर करून शेड्युल करा. 

– आता ऍप स्वतःच ठरलेल्या वेळी मॅसेज पाठवेल. 

तुम्हाला पाठवण्याआधी शेड्यूल केलेला मॅसेज पाहायचा असेल, तर ऍपमधील 'आस्क मी बिफोर सेंडिंग' फीचर सक्रिय करा. यानंतर, हे फीचर तुम्हाला मॅसेज पाठवण्यापूर्वी एक नोटिफिकेशन पाठवेल, ज्यामुळे तुम्ही मॅसेज तपासू शकता आणि वेळेवर पाठवू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo