WhatsApp ने काही काळापूर्वी यूजर प्रायव्हसी लक्षात घेऊन एक फीचर आणले होते, ते म्हणजे 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचर होय. व्हॉट्सऍप आता वापरकर्त्यांना पाठवलेले संदेश 2 दिवस आणि 12 तासांच्या आत हटवण्याची परवानगी देते. हे फीचर वापरकर्त्यांना तासांनंतरही चुकून पाठवलेले चॅट डिलीट करण्यास अनुमती देतो. डिलीट झालेले मॅसेजेस नंतर वाचता येत नाही.
हे फिचर उपयुक्त असले तरी, मॅसेज कोणता होता आणि तो का काढला गेला याची उत्सुकता प्राप्तकर्त्यास सोडते. मात्र, अशा काही युक्त्या आहेत ज्यांच्या मदतीने हटवलेले व्हॉट्सऍप मॅसेजेस वाचले जाऊ शकतात.
हे सुद्धा वाचा : Oppo ने भारतात लाँच केला आकर्षक डिझाइन आणि 108MP कॅमेरा फोन, जाणून घ्या किंमत
तुमच्या WhatsApp डेटाचा नियमित बॅकअप घ्या आणि पूर्वीच्या बॅकअपमधून मेसेज रिस्टोअर करा. हे करण्यासाठी, WhatsApp सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप वर जा. आता जुना बॅकअप शोधा ज्यामध्ये हटवलेले मॅसेज आहेत. मात्र, असे केल्याने तुम्हाला ऍप हटवावे लागेल आणि पुन्हा लॉगिन करावे लागेल आणि बॅकअप चालवावा लागेल.
तिसरा पर्याय सर्वात सुरक्षित आणि सोपा आहे. हे फक्त Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे (Android 11). यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…
– तुमच्या डिव्हाइसच्या 'सेटिंग्ज' वर जा.
– आता खाली स्क्रोल करा आणि "Apps & Notifications" वर टॅप करा.
– आता Notifications निवडा.
– पर्यायाखालील Notification history वर क्लिक करा.
– पुढे 'Use notification history' च्या पुढील बटण टॉगल करा.
एकदा नोटिफिकेशन हिस्ट्री चालू केल्यावर, तुम्ही WhatsApp मॅसेजच्या नोटिफिकेशन्स डिलीट केल्यानंतरही पाहू शकाल.