UPI मधून चुकीच्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झाले? काळजी करू नका, फक्त ‘ही’ सोपी प्रक्रिया करा

Updated on 29-Dec-2022
HIGHLIGHTS

UPI मधून चुकीच्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केल्यास 15 दिवसांच्या आत रिफंड मिळेल.

फक्त खाली दिलेली प्रक्रिया करा.

अशी बरीच प्रकरणे मेलिंगद्वारे सोडविली जातात.

पेटीएम, गुगल पे किंवा इतर UPI ने जीवन अगदी सोपे केले आहे. तुम्ही मोबाईल नंबरद्वारे किंवा QR कोड स्कॅन करून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज पैसे पाठवू शकता. पण तुम्ही चुकून चुकीच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवले किंवा फसवा QR कोड स्कॅन केला तर? तर काळजी करण्याची गरज नाही. या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचे पैसे परत मिळवा.

हे सुद्धा वाचा : USB Type-C: भारतात फोनपासून लॅपटॉपपर्यंत असेल एकच चार्जर, सरकारने दिली मान्यता

रिफंड मिळवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

– चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्यास, सर्वप्रथम तुमच्या बँकेला मेल करा. अशी बहुतेक प्रकरणे केवळ मेलिंगद्वारे सोडविली जातात.

– पण मेल करूनही तुमचा प्रश्न सुटला नाही, तर तुम्हाला स्वत: बँकेच्या शाखेत जावे लागेल.

– तुमची काही महत्त्वाची कागदपत्रेही सोबत घ्या. ही कागदपत्रे तुम्हाला बँकेत जमा करावी लागतील.

– असे केल्यावर बँक मॅनेजरचा रिप्लाय येईल आणि तुमचे पैसे बँकेत परत केले जातील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची बँकेत तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीच्या एका आठवड्यात किंवा 15 दिवसांच्या आत बँक तुमच्या खात्यात पैसे परत करते. म्हणजे ज्या खात्यातून पैसे कापले जातात, त्याच खात्यात परत येतात.

 RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर कोणी तुमच्या वतीने पाठवलेले पैसे खर्च केले किंवा इतर कोणत्याही खात्यात ट्रान्सफर केले, तर अशा परिस्थितीतही RBI बँक तुम्हाला परतावा देईल. त्यांनतर अशा परिस्थितीत, ज्या व्यक्तीने पैसे खर्च केले आहेत त्यांची शिल्लक ऋणात्मक केली जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :