UPI Payment without Internet: फोनमध्ये इंटरनेट नाही आणि महत्त्वाचे पेमेंट करणे बाकी आहे? जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया 

UPI Payment without Internet: फोनमध्ये इंटरनेट नाही आणि महत्त्वाचे पेमेंट करणे बाकी आहे? जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया 
HIGHLIGHTS

UPI पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे, आवश्यक आहे.

अलीकडेच NPCI ने ऑफलाइन पेमेंट करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे.

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.

आजकाल जवळपास सर्व UPI पेमेंटची सुविधा वापरतात. आपल्याला माहितीच आहे की, आपल्यापैकी बरेच जण शॉपिंगपासून ते मोबाईल रिचार्ज आणि वीज बिल भरण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. या सेवेमुळे पैशांचे व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. मात्र, या सुविधेद्वारे युजर्स आपल्या खिशात पैसे ठेवण्याचे टाळतात. अशा परिस्थितीत जेव्हा इंटरनेट कार्य करत नाही तेव्हा समस्या सर्वात जास्त उद्भवते. ज्यामुळे ऑनलाइन पेमेंट करणे, अवघड होऊन बसते.

अशा परिस्थितीत, ही समस्या दूर करण्यासाठी NPCI ने नुकतीच ऑफलाइन पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. तुम्हालाही जर महत्त्वाचे पेमेंट करायचे असेल आणि तुमच्या फोनवर इंटरनेट काम करत नसेल किंवा डेटा संपला असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही इंटरनेटशिवायही पेमेंट करू शकता.

Also Read: How to: तुमच्या Airtel प्रीपेडला ऑनलाईनरीत्या घरबसल्या पोस्टपेडमध्ये कसे बदलावे? येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

UPI द्वारे ऑफलाईन पेमेंट कसे करावे?

  • ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये USSD कोड ‘*99#’ डायल करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर Welcome to *99# सह OK लिहून येईल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला ‘सेंड मनी’ निवडावे लागेल.
  • त्यानंतर मोबाईल नंबरचा पर्याय सिलेक्ट करा.
  • ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर फील-अप करा.
  • तुम्हाला स्क्रीनवर लिहिलेले युजरचे नाव दिसेल ज्याला तुम्ही पैसे ट्रान्सफर करत आहात.
  • यानंतर अमाउंट टाका आणि तुमचा UPI पिन टाका. अशा प्रकारे ऑफलाइन पेमेंट पूर्ण होईल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक बँक कनेक्टेड असलेला पाहिजे. आधार आणि फोन नंबर लिंक नसल्यास तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय पेमेंट करू शकणार नाही.
UPI

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, UPI सेवा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. सध्याच्या घडीला भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही सेवा वापरत आहे, अशी माहिती मिळाली आहे. पेमेंटच्या बाबतीत भारताच्या UPI ने चीनच्या Alipay आणि अमेरिकेच्या PayPal ला देखील मागे टाकले आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo