Paytm अकाउंट डिलीट करायचे आहे ? येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

Updated on 10-Jan-2023
HIGHLIGHTS

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन आणि iPhone दोन्हीवरून पेटीएम खाते हटवू शकता.

यासाठी तुम्हाला ऍप किंवा फोन सेटिंगमध्ये जाण्याची गरज नाही.

यासाठी वापरकर्त्यांना काही कागदपत्रेही द्यावी लागतील.

Paytm हे लोकप्रिय पेमेंट ऍप आहे. यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही मोबाईल रिचार्ज, वीज बिल आणि चित्रपटाची तिकिटे इत्यादी देखील बुक करू शकता. मात्र, यानंतरही अनेकांना काही कारणांमुळे त्यांचे पेटीएम खाते डिलीट करायचे असते. या लेखात, आम्ही तुम्हाला Paytm खाते हटवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. 

हे सुद्धा वाचा : Netflix, Amazon Prime मध्ये स्पर्धा, आता दोघांचेही मिळणार मोफत सबस्क्रिप्शन…

Paytm अकाउंट डिलीट कसे कराल ? Android साठी या स्टेप्स फॉलो करा…

– Android डिव्हाइसवरून पेटीएम खाते हटवण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे ऍप उघडा.

– यानंतर डाव्या बाजूला येणाऱ्या पर्यायावर क्लिक करून ऍपच्या मेनूवर जा.

– असे केल्याने अनेक पर्याय तुमच्या समोर येतील. त्यापैकी Help & Support वर क्लिक करा.

– त्यानंतर प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. जर तुम्हाला हा पर्याय सापडला नाही तर खाली स्क्रोल करा.

– आता तुम्हाला स्क्रीनच्या मध्यभागी निळ्या रंगाचे Chat with us बटण मिळेल. त्यावर क्लिक करा.

– ऍटोमॅटिक पर्सनल असिस्टंट अनेक पर्यायांसह येईल. त्यामध्ये  I want to close/delete my account वर क्लिक करा.

– हे तुम्हाला महत्त्वाच्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगेल. पुढे जाण्यासाठी फक्त yes पर्यायावर क्लिक करा. तुम्ही रद्द केलेल्या चेकचे चित्र यासारखी कागदपत्रे देखील पाठवावे लागू शकतात.

– काही दिवसांनी तुमचे खाते हटवले जाईल.

iPhone द्वारे पेटीएम खाते डिलीट करण्याची पद्धत देखील वर नमूद केलेल्या प्रक्रियेसारखीच आहे. मात्र, आपल्याला याशिवाय एक किंवा दोन स्टेप्स फॉलो करावे लागतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :