digit zero1 awards

Instagram अकाउंट कसे डिलीट कराल? ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया

Instagram अकाउंट कसे डिलीट कराल? ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया
HIGHLIGHTS

तरुणांमध्ये Instagram ला खूप पसंती दिली जाते.

Instagram अकाउंट डिलीट करण्याची सोपी प्रक्रिया

तुम्ही अकाउंट तात्पुरते निष्क्रियदेखील करू शकता.

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. तरुणांमध्ये Instagram ला खूप पसंती दिली जाते. फोटो आकर्षक करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर अनेक फिल्टर आणि मोड आहेत. या सर्व गोष्टी असूनही वापरकर्त्यांना त्यांचे खाते डिलीट आहे किंवा ते तात्पुरते निष्क्रिय करायचे आहे, तर त्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. इन्स्टाग्राम डिलीट करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात…

हे सुद्धा वाचा : मोठा निर्णय ! 134 बेटिंग आणि 94 लोन ऍपवर बंदी, याचा डिटेल्स…

इन्स्टाग्रामच्या हेल्प सेंटरनुसार, अकाउंट डिलीट केल्यानंतर यूजर्सचे प्रोफाईल फोटो, व्हिडिओ, कमेंट्स, लाईक्स आणि फॉलोअर्स इत्यादी डिलीट केले जातील. जर तुम्हाला Instagram खाते कायमचे हटवायचे नसेल, तर तुम्ही खाते Temporarily Deactivate निवडू शकता.

मोबाईल ऍपवरून इंस्टाग्राम अकाउंट कसे डिलीट कराल? 

– स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ऍप ओपन करा. 

– त्यानंतर खाली दिलेल्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.

– वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन लाईन्सच्या पर्यायावर जा.

– यानंतर तुम्हाला इन्स्टाग्राम सेटिंग्जचा पर्याय मिळेल.

– Settings मध्ये Accounts Center वर क्लिक करा.

– त्यानंतर, Personal detailsवर जा आणि ते पूर्णपणे अपडेट करा.

– यानंतर अकाउंट ओनरशिप आणि कंट्रोल वर जा आणि डिएक्टिव्हेशन किंवा डिलीशन वर क्लिक करा. 

– कायमस्वरूपी खाते हटवण्यासाठी, Delete account  वर क्लिक करा. 

ही प्रक्रिया इन्स्टाग्रामच्या हेल्प सेंटरवरून घेतली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo