DESKTOP आणि MOBILE BROWSER चे CACHE असे करा क्लियर

DESKTOP आणि MOBILE BROWSER चे CACHE असे करा क्लियर
HIGHLIGHTS

Google Chrome वर या स्टेप्स फॉलो करू शकता

Cache क्लियर करण्यासाठी मोबाईल आणि डेस्कटॉपवरून असे क्लियर करा Cache

आम्ही तुमच्यासाठी आधीपण अनेक सोप्प्या टिप्स आणि ट्रिक्स किंवा How to शेयर केले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही सहज Tech संबंधित अडचणी दूर करू शकता. आज आम्ही एक अशी माहिती देणार आहोत जी खूप सोप्पी आहे पण माहित नसल्यामुळे खूप मोठी आणि कठीण वाटते. आम्ही Cache (कॅशे) क्लियर करण्याबाबत बोलत आहोत कारण हे एखादी वेबसाइट जलद गतीने उघडण्यास मदत करतात पण त्याचबरोबर थोडेफार नुकसान पण आपल्याला होते. जसे कि वेब पेजचे अप-टू-डेट वर्जन न मिळणे, किंवा वेब पेज योग्यरीत्या न उघडणे आणि अनेकदा पेज लोडच होत नाही. तुम्ही सर्व प्रसिद्ध वेब ब्राउजर Chrome, Firefox, Edge, Internet Explorer आणि Safari इत्यादी मध्ये Cache क्लियर करू शकता. 

डेस्कटॉप वर GOOGLE CHROME चे CACHE असे क्लियर करा… 

 

  • सर्वात आधी आपल्या डेस्कटॉप वर Google Chrome आइकॉन वर क्लिक करून तो उघडा.
  • त्यानंतर, स्क्रीनच्या टॉप-राईट कॉर्नर वरील तीन डॉट्स वर क्लिक करा. 
  • तिथे देण्यात आलेल्या पर्यायांपैकी More tools चा पर्याय निवडा आणि त्यानंतर clear browsing data… वर क्लिक करा. 
  • नवीन पेज उघडल्यावर बेसिक विकल्प वर जाऊन आणि टाइम रेंज मध्ये सोयीनुसार म्हणजे last hour, last 7 days किंवा All time निवडा. 
  • इथे Cached image and files पर्याय निवड आणि इतर बॉक्सेज तुम्ही अनचेक पण करू शकता. 
  • आता खाली जाऊन क्लियर डेटा बटण वर क्लियर करा. अशाप्रकारे तुम्ही Google Chrome चे Cache क्लियर करू शकता. 

MOBILE वर GOOGLE CHROME चे CACHE असे क्लियर करा… 

 

  • आपल्या मोबाईल फोन मध्ये Google Chrome ऍप वर जा.
  • डेस्कटॉप प्रमाणे मोबाईल मध्ये पण स्क्रीनच्या टॉप राईट कॉर्नर वरील थ्री डॉट्स वर जा. 
  • इथे तुम्हाला हिस्ट्री पर्यायावर टॅप करा. 
  • आता स्क्रीनच्या खाली clear browsing data चा पर्याय मिळेल त्या वर टॅप करा. 
  • इथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, तुम्ही या पर्यायांपैकी Cached image and files ऑप्शन निवडा. इतर विकल्प तुम्ही अनचेक करू शकता. 
  • आता clear browsing data पर्यायावर टॅप करा, क्लियर डेटा वर जाऊन तुम्ही कॅशे क्लियर करू शकता. 
Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo