Jio True 5G: Jio चे 5G नेटवर्क अजून येत नाही, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Updated on 31-Dec-2022
HIGHLIGHTS

JIO ट्रू 5G ची सर्व्हिस मिळत नाहीये.

JIO वेलकम ऑफर मिळवण्यासाठी काय करावे, ते बघा...

स्टेप बाय स्टेप खालील प्रक्रिया फॉलो करा, आणि JIO ट्रू 5G सेवेचा आनंद घ्या.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2023 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेली Jio ची 5G सेवा आता देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. कंपनी त्याचा सतत विस्तार करत आहे आणि आतापर्यंत जवळपास 30 शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू झाली आहे. Jio 5G सेवा सध्या बीटा टप्प्यात आहे, म्हणून ती केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी वेलकम ऑफरच्या आमंत्रणाद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. 

जर तुमच्या शहरात Jio 5G सेवा आहे, परंतु तुम्ही ती वापरण्यास सक्षम नसाल तर तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, ज्या तुम्हाला Jio True 5G सेवा वापर करण्यास मदतगार ठरतील. 

हे सुद्धा वाचा : स्पॅम कॉल आल्यावर Google देईल अलर्ट, Truecaller ची होणार का सुट्टी ?

'अशा'प्रकारे मिळेल JIO 5G चा लाभ

– सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5G इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. 5G फोनमध्येही 5G इंटरनेट वापरण्यासाठी, 5G सपोर्टसाठी फोन अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

– Jio ने अद्याप कोणताही 5G प्लॅन जारी केलेला नाही. परंतु Jio 5G नेटवर्क वापरण्यासाठी, तुमच्या नंबरवर 239 रुपये किंवा त्याहून अधिकचा प्लॅन सक्रिय असावा. तरच तुम्ही जिओ वेलकम ऑफर्ससाठी पात्र असाल.

– Jio ची स्वागत ऑफर मिळवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये MyJio ऍप इंस्टॉल करावे लागेल.

– आता ऍप ओपन करून लॉगिन करा.

–  आता तुम्ही Jio 5G रोलआउटच्या शहरात असाल तर तुम्हाला होम स्क्रीनवर 'Jio Welcome Offer' लिहिलेले दिसेल. 

– दुसरीकडे, पर्याय दिसत नसल्यास, पेज रिफ्रेश करा. या कार्डवर टॅप केल्यानंतर, तुम्ही Jio च्या 5G सेवांचा लाभ घेऊ शकाल आणि तुमची नोंदणी केली जाईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :