Tech Tips: तुमच्या चुकांमुळे लवकर खराब होतात Earbuds, ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता

Tech Tips: तुमच्या चुकांमुळे लवकर खराब होतात Earbuds, ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता
HIGHLIGHTS

Earbuds खराब होऊ नयेत म्हणून कशी काळजी घ्यावी.

Earbuds वापरल्यानंतर केसमध्ये व्यवस्थित ठेवले पाहिजेत.

बहुतेक इयरबड्स आता वॉटरप्रूफ आहेत, तरीही त्यांना पाणी किंवा आर्द्रतेपासून दूर ठेवा.

स्मार्टफोन्स आणि इतर उपकरणांसह Earbuds देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत. मात्र, अनेक युजर्स त्यांचा योग्य वापर करत नाही, त्यामुळे इयरबड्स लवकर खराब होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इअरबड्स जास्त काळ टिकण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता इयरबड्स वापरताना कोणत्या चुका करू नये. यादी पुढीलप्रमाणे-

Also Read: How to: WhatsApp कॉल आल्यावर प्ले होणार तुमचे आवडते गाणे, ‘अशा’प्रकारे बदला तुमची रिंगटोन

Earbuds योग्यरित्या न ठेवणे.

Earbuds वापरल्यानंतर केसमध्ये व्यवस्थित ठेवले पाहिजेत. त्यांना आजूबाजूला फेकून दिल्याने किंवा गोंधळलेल्या अवस्थेत ठेवल्याने वायर आणि इअरपीस खराब लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. इअरबड्स नेहमी त्यांच्या चार्जिंग केस किंवा बॅगमध्ये ठेवा, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही.

मोठ्या आवाजात गाणी ऐकणे.

इअरबड्स दीर्घकाळ किंवा खूप जास्त आवाजात वापरल्याने त्यांच्या ड्रायव्हरला म्हणजेच स्पीकर्सना नुकसान होऊ शकते. यामुळे, उपकरणाची साउंड कॉलिटी कमी होऊन इअरबड खराब होऊ शकतात. आवाज मिड लेव्हलवर ठेवा आणि जास्त काळ इअरबड वापरणे टाळा.

Earbuds पाणी किंवा आर्द्रतेच्या संपर्कात वारंवार येणे.

जरी बहुतेक इयरबड्स आता वॉटरप्रूफ आहेत, तरीही त्यांना पाणी किंवा आर्द्रतेपासून दूर ठेवणे, गरजेचे आहे. विशेषतः आंघोळ करताना किंवा पावसात इअरबड्स अजिबात वापरू नका. पाणी किंवा घामामुळे इलेक्ट्रॉनिक सर्किट खराब होऊ शकतात, ज्यामुळे इयरबड्स काम करत नाही.

Earbuds पडणे किंवा धक्का लागणे.

इअरबड्स वारंवार पडल्याने किंवा त्यांना जोरात ओढल्याने त्यांच्या आतील सर्किट्सला नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही लहान आणि नाजूक उपकरणे आहेत. इयरबड्सची काळजीपूर्वक देखभाल करणे आवश्यक आहे.

EARBUDS CARING TIPS

ओव्हर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग

इयरबड्स सतत चार्जिंगवर ठेवल्याने बॅटरीचे देखील नुकसान होते. बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज केल्याने बॅटरी लाईफ कमी होऊ शकते. इयरबड्सची बॅटरी 20-80% दरम्यान चार्ज ठेवा आणि बॅटरी जास्त चार्ज करणे देखील टाळा.

Earbuds नियमित स्वच्छ न करणे.

इयरबड्स वेळोवेळी स्वच्छ न केल्याने त्यावर धूळ, घाण आणि कानातले मेण साचते. ज्यामुळे त्यांच्या आवाजाची कॉलिटी बिघडते आणि खराब देखील होऊ शकते. इयरबड्स नियमितपणे मऊ कापडाने किंवा ब्रशने स्वच्छ करा आणि कोणतेही केमिकल आणि पाण्याचा वापर करू नका.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo