व्हाट्सॅप ने आपला नवीन ग्रुप डिस्क्रिप्शन फीचर केला सादर, जाणून घ्या कसा करायचा याचा वापर
आता तुम्ही तुमच्या व्हाट्सॅप ग्रुप मध्ये डिस्क्रिप्शन फीचर चा वापर करून ग्रुप डिस्क्रिप्शन अॅड करू शकता.
व्हाट्सॅप ने आपल्या यूजर्स साठी नवीन ग्रुप डिस्क्रिप्शन फीचर सादर केला आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या कोणत्याही व्हाट्सॅप ग्रुप ला डिस्क्रिप्शन अॅड करू शकता. हे डिस्क्रिप्शन ग्रुप च्या सर्व मेम्बर्सना दिसेल.
व्हाट्सॅप चा हा नवीन अपडेट एंड्राइड आणि iOS यूजर्स साठी उपलब्ध आहे. कंपनी ने आपल्या नव्या ग्रुप डिस्क्रिप्शन फीचर चा बीटा वर्जन मागच्याच महिन्यात जारी केला होता. या फीचर सह व्हाट्सॅप मध्ये काही नवीन फीचर अपडेट्स चा पण समावेश करण्यात आला आहे. जसे, एंड्राइड यूजर्स ग्रुप मध्ये कोणत्याही मेंबरला सर्च करू इच्छित असतिल तर ग्रुप इन्फो मध्ये जाऊन सर्च करू शकतात किंवा मग व्हाट्सॅप कॉल दरम्यान ऑडियो कॉल वरून वीडियो कॉल वर स्विच करू शकतात.
आज आपण बोलत आहोत व्हाट्सॅप च्या ग्रुप डिस्क्रिप्शन फीचर बद्दल, चला तर मग बघुया कसा हा नवीन फीचर वापरायचा ते.
सर्वात आधी या नव्या फीचर चा वापर करण्यासाठी गूगल प्ले स्टोर वरून व्हाट्सॅप अपडेट करा आणि ओपन करा.
ज्या ग्रुप मध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन अॅड करू इछिता त्याला ओपन करून त्याच्या नावावर टॅप करा.
तिथे आधी असलेल्या ग्रुप डिस्क्रिप्शन वर टॅप करा.
ग्रुप बद्दल जे पण डिस्क्रिप्शन लिहायचे असेल ते लिहून ओके वर टॅप करून सेव करा.
ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही 512 कॅरेक्टर्स अॅड करू शकता. व्हाट्सॅप चा सर्च पार्टिसिपेंट फीचर फक्त एंड्राइड यूजर्स साठी उपलब्ध आहे. तसेच व्हाट्सॅप वर कॉल दरम्यान तुम्ही कॉल डिसकनेक्ट न करता ऑडियो वरून वीडियो कॉल वर स्विच करू शकता. हा फीचर एंड्राइड आणि iOS दोन्ही साठी उपलब्ध आहे.