अनेक वेळा आपण एकाच फोनमध्ये दोन सिम वापरतो. त्याचबरोबर या दोन्ही सिमवर WhatsApp ही सक्रिय आहे. आता कधी कधी गोंधळ होतो की, एकाच फोनमध्ये दोन WhatsApp अकाउंट कसे चालवायचे. दरम्यान, कंपनीने एक फीचर लाँच केले आहे जे तुम्हाला एका नंबरवरून एकाधिक डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याची परवानगी देते. पण आजही अनेकांना एकाच फोनमध्ये दोन ऍप कसे वापरायचे हे माहीत नाही.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! अगदी निम्म्या किमतीत मिळतोय Samsung Galaxy S22 Plus, लिमिटेड ऑफर
Oppo, Xiaomi, Vivo, Huawei, Samsung, OnePlus, Realme सारखे काही स्मार्टफोन उत्पादक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये Dual Apps सपोर्ट देतात. ज्यामुळे तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन समान ऍप्स चालवता येतात. याद्वारे तुम्ही थर्ड पार्टी ऍप डाऊनलोड न करता एकाच फोनमध्ये दोन WhatsApp खाती चालवू शकता. कसे ते जाणून घेऊयात…
– सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या डिव्हाईस सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून Apps वर जावे लागेल.
– जेव्हा तुम्ही Apps वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला Dual Apps चा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला Create वर टॅप करावे लागेल.
– यानंतर ड्युअल ऍप सपोर्टेड ऍप्समधून WhatsAppची निवड करावी लागेल. यानंतर ड्युअल ऍप्सच्या पुढे टॉगल ऑन करा आणि थोडा वेळ प्रतीक्षा करा.
– त्यानंतर तुम्हाला ऍप लाँचरवर जावे लागेल. त्यानंतर ड्युअल ऍप आयकॉनसह व्हॉट्सऍपवर जा.
– यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या क्रमांकासह व्हॉट्सऍप वापरू शकता.