WhatsApp द्वारे तुम्ही कॉल करणे, मेसेज करणे, कागदपत्रे पाठवणे आणि पैसे पाठवणे यासारख्या गोष्टी आता सहज करू शकता. आता आम्ही तुम्हाला WhatsAppबद्दल एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. याबाबत क्वचितच युजर्सना माहिती आहे.
हे सुद्धा वाचा : Nokia चा नवीन फ्लॅगशिप फोन भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये…
आम्ही तुम्हाला एक अप्रतिम ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कोणाशीही दुसऱ्या भाषेतही बोलू शकता. जर तुम्ही दुसरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीशी बोलत असाल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. मात्र, या कामात व्हॉट्सऍप तुमची मदत करू शकते. येथे एक 'इन-बिल्ट ट्रान्सलेशन' फिचर आहे, जे तुम्हाला यात मदत करेल.
– सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या चॅटवर जावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर संपूर्ण मॅसेज सिलेक्ट करा.
– यानंतर एक मेनू येईल ज्यामध्ये तुम्हाला More निवडावे लागेल.
– त्यानंतर Translate पर्यायावर टॅप करा.
– नंतर एक पॉप-अप विंडो दिसेल, ज्यामध्ये मॅसेज अनुवादित केला जाईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेनुसार ट्रान्सलेशन भाषा बदलू शकता.
हे फिचर फक्त Android WhatsApp आवृत्ती 2.20.206.24 आणि त्यावरील आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. तर, ते iPhone 2.20.70 आणि त्यावरील आवृत्तीवर उपलब्ध आहे.