तुम्हाला माहिती आहे का व्हाट्सऍप वर कॉन्टॅक्ट सेव न करता पण मेसेज पाठवता येतात ते?

तुम्हाला माहिती आहे का व्हाट्सऍप वर कॉन्टॅक्ट सेव न करता पण मेसेज पाठवता येतात ते?
HIGHLIGHTS

आता पर्यंत आपल्याला एवढंच माहिती आहे कि व्हाट्सऍप वर एखादयला मेसेज इत्यादी पाठवण्याआधी तुमच्या फोन मध्ये त्यांचा नंबर सेव असला पाहिजे. पण हे गरजेचे नाही, एक सोप्पी पद्धत आहे जी वापरून तुम्ही नंबर सेव न करता पण व्हाट्सऍप वर मेसेज पाठवू शकता. चला बघूया कसे?

आजकाल टेक्नॉलिजीने आपल्याला असे घेरले आहे कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी पण तिला आपल्या आयुष्यापासून वेगळी करू शकत नाही. आज इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. जर आपण व्हाट्सऍप बद्दल बोलायचे झाले तर या इन्स्टंट मेसेजिंग ऍप विना आजकाल एखाद्या व्यक्तिचा दिवस जाऊ शकत नाही. व्हाट्सऍप विना आपण आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. तसेच व्हाट्सऍप सध्या जगातील सर्वात प्रसिद्द इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनला आहे.

आतापर्यंत आपण हेच ऐकत आणि बघत आलो आहे कि व्हाट्सऍप वर एखाद्याला मेसेज करण्यासाठी तुम्हाला त्याचा नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव करावा लागेल, त्यानंतर समोरच्या व्यक्तीला मेसेज इत्यादी करता येतील. त्यातही समोरील व्यक्ती व्हाट्सऍप वर असणे आवश्यक आहे, हे म्हणणे पण मोठयाप्रमाणावर चुकीचे ठरू शकते कारण आजकाल तुम्हाला क्वचितच असा कोणी तरी मिळेल, जो एक स्मार्टफोन वापरत आहे, किंवा एखादा इतर मोबाइल फोन वापरात आहे, ज्यावर तुम्ही व्हाट्सऍप वापरू शकता, असे असताना तो साहजिकच व्हाट्सऍप या डिवाइस मध्ये वापरात असेलच.

उदाहरणार्थ समजा तुम्ही व्हाट्सऍपचा वापर करत आहात आणि तुम्ही एखाद्या दुकानावर वर गेलात. तिथे तुम्हाला एखादा ड्रेस आवडला पण तुम्हाला अजून काही डिजाईन बघायचे आहेत पण पुन्हा एकदा त्या दुकानाला भेट द्यायची नाही. अशावेळी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये या दुकानाच्या ओनरचा नंबर सेव करायला आवडेल का? असे पण होऊ शकते कि तुम्ही नंबर सेव कराल पण. परंतु तुम्हाला असे करण्याची गरज नाही. तुम्ही कोणाचाही नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव न करता पण समोरच्या व्यक्तीशी व्हाट्सऍप चॅट करू शकता. असे अनेक थर्ड पार्टी ऍप्स बाजारात आहेत जे हे काम करतात.

पण त्यांच्यामुळे तुमच्या फोनला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ऍप्स पासून दूर राहण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत, कारण जर तुम्ही असे केलेत तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया काही सोप्प्या स्टेप्स ज्यांचा अवलंब करून तुम्ही अगदी सहज एखादा नंबर आपल्या फोन मध्ये सेव ना करता पण व्हाट्सऍप चॅटिंग करू शकता.

पण असे करण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि तुम्ही विवेकबुद्धीने या स्टेप्स फोल्लो केल्या पाहिजेत. कारण कधी कधी ज्या पद्धती बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या फोन मध्ये एखादी समस्या पण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्या.

नंबर सेव न करत कसा करावा व्हाट्सऍप मेसेज
1. सर्वात आधी तुमच्या फोन मध्ये तो ब्राउजर ओपन करा जो तुम्ही वापरात आहात.
2. आता सर्च बार मध्ये https://api.WhatsApp.com/send?phone=number, इथे नंबरच्या जागी तो नंबर कंट्री कोड सह टाका ज्याला तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्यानंतर इंटर करा.
3. त्यानंतर व्हाट्सऍप विंडो तुम्हाला तुम्ही जो नंबर टाकला आहे, त्यावर व्हाट्सऍप मेसेज पाठवायचा आहे कि नाही हे विचारेल. तुम्हाला तिथे सेंड मेसेज वर क्लिक करावे लागेल.
4. आता तुम्हाला एक व्हाट्सऍप चॅट विंडो ओपन झालेली दिसेल, आणि तुम्ही नंबर सेव न करता पण आता व्हाट्सऍप चॅटकरू शकला.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo