तुम्हाला Email वर अशी PDF फाइल मिळाली आहे, ज्यामध्ये पासवर्ड सेट केलेला आहे आणि फाइल उघडताना तुम्हाला वारंवार पासवर्ड टाकावा लागतो. जर, हीच फाईल तुम्ही पुढे पाठवली, तर पुढील व्यक्तीलाही याच अडचणीला सामोरे जावे लागेल. या अडचणी दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत…
हे सुद्धा वाचा : Airtel 5G Plus सह मिळतात 2 जबरदस्त फायदे, बघा काय आहे खास ?
कोणत्याही PDF फाईलमध्ये पासवर्ड सेट केला असेल आणि पासवर्ड टाकताना तुम्हाला त्रास होत असेल, तर PDF रीडरच्या मदतीने तुम्ही पासवर्ड काढू शकता.
– सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपवर PDF रीडरमध्ये PDF फाईल उघडा.
– यानंतर Tools > Encrypt > Remove Security वर जा.
– यानंतर तुमच्या फाईलचा पासवर्ड टाका आणि OK दाबा.
– PDF फाइल पासवर्ड टाकल्यानंतर सॉफ्टवेअर तुमच्या फाइलमधून पासवर्ड काढून टाकेल.
– सर्व प्रथम Google Chrome मध्ये तुमच्या पासवर्डसह PDF फाईल उघडा.
– यानंतर PDF फाइलचा पासवर्ड टाकून फाइल ओपन करा.
– फाइल उघडल्यानंतर, तुम्हाला Ctrl + P किंवा File > Print > Save as PDF ची कमांड द्यावी लागेल.
– सेव्ह PDF ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर हवी तिथे फाइल सेव्ह करू शकता.
त्यानंतर, जेव्हा लोक ही सेवा केलेली फाइल उघडतील, तेव्हा या नवीन फाइलमधून पासवर्ड काढून टाकला जाईल.