Whatsapp संपूर्ण जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या ऍपमध्ये अनेक सिक्रेट फीचर्स आहेत. अशा काही युक्त्या आहेत ज्या प्रत्येक Android फोनवर उपलब्ध आहेत. क्वचितच लोकांना या युक्त्यांबद्दल माहिती आहे. अशीच एक युक्ती म्हणजे मेसेजिंग ऍप न उघडता संपूर्ण WhatsApp मॅसेज वाचणे.
हे सुद्धा वाचा : Oppo Reno 8T 5G ची पहिली सेल सुरू, नव्या फोनवर मिळतेय भरघोस सूट
ही ट्रिक अगदी सोपी आहे. मेसेजिंग ऍप न उघडता तुम्ही संपूर्ण WhatsApp मॅसेज कसे वाचू शकता ते बघा…
– अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना सर्वप्रथम मुख्य स्क्रीनच्या होमपेजवर लॉन्ग प्रेस करावे लागेल.
– आता, विजेट्सवर टॅप करा आणि तुमचा स्मार्टफोन स्क्रीनवर सर्व विजेट्स दर्शवेल.
– WhatsApp विजेट सापडेपर्यंत खाली स्क्रोल करत रहा.
– आता WhatsApp विजेटवर टॅप करा आणि ते तुमच्या होमपेजवर जोडले जाईल.
– त्यानंतर तुम्ही विजेटवर जास्त वेळ प्रेस करा आणि जोपर्यंत तुम्हाला स्पष्ट होमपेज स्क्रीन इंटरफेस मिळत नाही तोपर्यंत उजवीकडे ड्रॅग करा.
– आता Done बटणवर टॅप करा. विजेट लॉन्ग प्रेस करून टॉप वर शिफ्ट करा.
– यानंतर, विजेटला पुन्हा विस्तारित करण्याचा पर्याय असेल आणि तो पूर्ण स्क्रीनपर्यंत वाढवता येईल.
– यामुळे संपूर्ण मॅसेज सहजपणे वाचणे सोपे होईल.