आजकाल Instagram reelsचे तरुणाईला भलतेच क्रेझ आहे. पण काही लोक सध्या यामुळे त्रासले आहेत. कारण, त्यांचे रील ना व्हायरल होत आहेत आणि ना रील्सवर व्ह्यूज येत. म्हणून आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची इंस्टाग्राम रील्स व्हायरल होण्यास मदत होईल. इंस्टाग्राम रील्स मॉनिटाइज्ड झाली आहे, जेणेकरून तुम्ही इंस्टाग्राम रील बनवून चांगले पैसे कमवू शकता.
हे सुद्धा वाचा : MWC 2023 मध्ये लाँच झालेल्या Nokia च्या तीन फोनमधील फरक पहा
तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर कॅप्शन ऍड करावेत. तसेच GIF आणि स्टिकर्स वापरावेत. याशिवाय, लोकेशन ऍड करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे युजरला रिल्सचे लोकेशन समजणे सोपे होईल.
जर तुम्हाला आकर्षक रील बनवायची असतील तर तुम्ही इंस्टाग्राम रील्सच्या गॅलरीमधून एआर इफेक्ट वापरावे. जे जगभरातील इन्स्टाग्राम निर्मात्यांनी बनवले आहे. येथे तुम्हाला भरपूर एआर इफेक्ट्स मिळतात.
इंस्टाग्रामवर अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल होतात. म्हणूनच तुम्ही व्हायरल ऑडिओ क्लिप वापरून रील बनवा. तसेच तुम्ही इंस्टाग्राम म्युझिक वापरू शकता. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही व्हॉईस ओव्हर देखील युज करू शकता.
इंस्टाग्राम रील तयार करण्यासाठी नेहमी पूर्ण आकाराची फ्रेम वापरली जावी. यामुळे तुमची रील बघायला छान दिसेल.
इंस्टाग्राम रीलच्या समोर छोटा टेक्स्ट लिहिणे उत्तम राहील, ज्यामुळे वापरकर्त्यांची अधिक व्यस्तता होते. तुम्ही कलर्ड आणि क्रिएटिव्ह टेक्स्ट लिहा. रीलशी संबंधित तपशील खाली वर्णनात लिहावेत. टॅगिंग आणि हॅशटॅगिंग रीलवर देखील केले पाहिजे.