Google Maps हे नेव्हिगेशन ऍप आहे. हे ऍप तुम्हाला मार्ग भटकू देत नाही. प्रवासादरम्यान अपेक्षित अंतर आणि वेळ शोधण्यासाठी बहुतेक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. तुम्ही गुगल मॅपवर पार्किंगचे ठिकाणही पाहू शकता. पण तुम्हाला माहित आहे का की, या ऍपच्या मदतीने तुम्ही संभाव्य टोल टॅक्स देखील जाणून घेऊ शकता. खरं तर , टोल टॅक्सचा चार्ज गुगल मॅपवरही पाहता येतो.
हे सुद्धा वाचा : JIO युजर्सची मजा! 895 रुपयांमध्ये मिळेल तब्बल 11 महिन्यांची वैधता आणि इतर बेनिफिट्स
गुगल मॅपवर कोणत्याही एका टोल प्लाझाचे दर पाहता येत नाहीत. यामध्ये, ठराविक अंतराच्या मध्यभागी येणाऱ्या संभाव्य टोल दरांबद्दल सांगितले आहे.
– Google मॅप्स ओपन करा.
– यानंतर, कुठे जायचे ते भरा.
– यानंतर, स्क्रीनवर मार्ग आणि संभाव्य वेळ खाली दर्शविला जाईल.
– संभाव्य वेळेच्या जागेला स्लाईड करून वर करा.
– यानंतर त्या मार्गावर लागू होणाऱ्या टोल टॅक्सची किंमत वरच्या बाजूला दिसेल.
येथे दर्शवलेली किंमत गुगल मॅप्सने संभाव्य किंमत असल्याचे सांगितले आहे. याद्वारे तुम्ही प्रवासादरम्यान झालेल्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन करू शकता.