लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जवळपास प्रत्येक भारतीय करतो. जास्तकरून युजर्स WhatsAppद्वारे एकमेकांशी सहज कनेक्ट राहतात. ऑफिस कर्मचारी असो किंवा कॉलेजचे विद्यार्थी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी WhatsApp चा वापर करतात. एकंदरीत WhatsApp तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. चॅटिंगसोबतच लोक कॉलिंगसाठीही व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
Also Read: Vodafone Idea प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे? पहा अगदी सोपी प्रक्रिया
होय, या WhatsApp वर तुम्ही व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलचाही आनंद घेऊ शकता. तुम्हालाही WhatsApp कॉल करायला आवडत असल्यास आम्ही तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. जर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या डिफॉल्ट कॉलर रिंगटोनचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ते तुमच्या आवडत्या गाण्यामध्ये देखील बदलू शकता. या सेटिंगनंतर, जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल येईल तेव्हा तुमचे आवडते गाणे फोनवर प्ले होईल. चला तर मग जाणून घेऊयात WhatsApp कॉलसाठी रींगटोन कशी बदलावी?
WhatsApp मध्ये असे अनेक सेटिंग्ज आहेत, ज्याचा वापर फार कमी लोक करतात. व्हॉट्सॲपच्या या रिंगटोन सेटिंगचे अनुसरण करून तुम्ही तुमचा WhatsApp कॉलिंग अनुभव आणखी मजेशीर करू शकता.